Sunday, December 22, 2024
Homeराज्यविध्यार्थ्याचा सर्वागीण विकास काळाची गरज - विकासजी राणे...

विध्यार्थ्याचा सर्वागीण विकास काळाची गरज – विकासजी राणे…

दानापूर – गोपाल विरघट

विध्यार्थी हा देशाचा कणा आहे, त्याचा सर्वागीण विकास, शाळा, महाविद्यालय येथे होतो. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परिक्षेची सुरूवात त्यांनी करावी. आपले व देशाचे हित यातच आहे असे प्रतीपादन नायब तहसीलदार विकासजी राणे यांनी स्व. नारायणीदेवी साह कनिष्ठ महाविद्यालय दानापूर येथील कार्यक्रमात व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रवींद्र घायल होते. स्व. पुंडलिकराव घायल कौटिल्य अभ्यासिका, दानापुर व
स्व. नारायणीदेवी साह कनिष्ठ महाविद्यालय ,सहकार विद्या मंदिर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने, स्पर्धा परीक्षा व कायदे विषयक मार्गदर्शन ह्या विषयावर सत्र ३१.०१.२०२४ ला आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून विकास राणे साहेब (नायब तसीलदार- तेल्हारा) व ॲड. विनयकुमार घायल, नागपूर लाभले. अंकुश मानकर कर्तव्यनिष्ठ तलाठी दानापूर ह्यांनी पण मुलांना मार्गदर्शन केले . यावेळी माजी महाविद्यालयीन विद्यार्थी नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक महादेव खोने यांचा नायब तहसीलदार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भगवत गीता देऊन आई वडिलांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी ॲड विनय घायल यांनी १८ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा मिळत असलेला मतदानाचा अधिकार व संविधान निर्मात्याच्या अपेक्षा हे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान सभेतील 25 नोव्हेंबर 1949 च्या शेवटच्या भाषणाचा हवाला देत सांगितले व मोटार व्हेईकल ॲक्ट, मुलीबद्दलच्या कायद्यातील तरतूदिबद्दल विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

माझी शाळा सुंदर शाळा या विषयाअंतर्गत कार्यक्रमा आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या परिसरातील युवकाची व महाविद्यालयीन विद्यार्थ्याची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विद्याधर खुमकर व प्रास्ताविक निवृत्ती बोरसे तर आभारप्रदर्शन प्रा. अजय चौबे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा. राजेंद्र इंगळे, गिरधर विरघट सर, पत्रकार सुनील धुरडे,प्रवीण लताळ, गणेश दुतोंडे, राहुल ठाकूर, चित्रा गांधी, राधा वाखारे, पल्लवी वाकोडे, संध्या राठोड, पूनम हागे, सुनीता कोरडे,ज्योत्सना वाघ, अन्नपूर्णा बेराळ, पुंडलिक घुले ह्यांनी अथक परिश्रम केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: