Tuesday, November 5, 2024
Homeराजकीयअकोल्यात लोकसभेसाठी भाजपकडून सर्व संभाव्य उमेदवार 'ऑक्सिजन'वर...भाजप नेमके कुणाला संधी देणार?…दोन्ही गटाला...

अकोल्यात लोकसभेसाठी भाजपकडून सर्व संभाव्य उमेदवार ‘ऑक्सिजन’वर…भाजप नेमके कुणाला संधी देणार?…दोन्ही गटाला धाकधूक…

न्यूज डेस्क : अकोला जिल्ह्यात गेल्या अडीच ते तीन वर्षापासून खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे हे आजारी असल्याने आगामी निवडणूक ते लढवणार नाहीत हे निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजपला त्यांचा वारसदार शोधावा लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नवीन चेहर्याला भाजपा संधी देणार असल्याचे बोलल्या जात आहे. तर येणाऱ्या निवडणुकीत भाजपाकडून सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा आहे. अकोल्यातही लोकसभेसाठी भाजपकडून नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरु असल्याची सूत्राकडून माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे अवघ्या महाराष्ट्रात सुद्धा काही जागांवर बदल होण्याची शक्यता आहे.

अकोल्यात भाजपमध्ये दोन गट आहेत एक खासदार धोत्रे गट व माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील या दोन्ही गटांमध्ये खासदार धोत्रे यांचा गट मोठा मानला जातो. तर या दोन्ही गटांकडून 2024 ची उमेदवारी आपल्याकडे आणण्याची स्पर्धा सुरु झाली. मात्र तिकीट नेमक कोणत्या गटाला मिळणार हे सांगता येणार नाही तर या गटाव्यतिरिक्त दुसर्याच कोणाला तरी तिकीट मिळणार अशीही चर्चा सुरु आहे. तर बाळापुरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर व अकोल्याचे डॉ.अशोक ओळंबे यांची नावे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून चर्चेत असल्याचे समजते.

यासाठी काल परवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी मुंबई आणि पुणे दौऱ्यावर आले होते. या दरम्यान जे. पी. नड्डा यांची भाजपच्या महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांसोबत बैठकीत लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्याची चर्चा आहे. त्यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची चाचपणी सुरु आहे. भाजपकडून प्रत्येक खासदाराचा रिपोर्ट कार्ड बनविण्यात आलय. ज्या खासदारांची कामगिरी सुमार असेल त्यांचं तिकीट कापलं जाणार आहे. त्याऐवजी भाजप आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. भाजपकडून राज्यात मिशन 45 राबवयाचं आहे. भाजपला हे मिशन सत्यात साकार करायचं असल्याने भाजप यावेळी योग्य उमेदवाराला संधी देणार आहे.

भाजपला आता कोणतीही जोखीम घ्यायची नाही. एखाद्या खासदाराची प्रतिमा खराब झाली असेल किंवा जनतेच्या मनात खासदाराबद्दल नाराजी निर्माण झाली असेल तर त्या खासदाराचं तिकीट कापून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्लॅन भाजपचा आहे. पण भाजपची ही रणनीती काही विद्यमान खासदारांसाठी धोक्याची आहे. भाजपच्या या रणनीतीनुसार आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: