सुवर्ण जयंती (50)वर्ष..स्पर्धेची जय्यत तयारी!
नांदेड – महेंद्र गायकवाड
देशात नियमितपणे खेळविली जाणारी अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट स्पर्धेचे हे 50 वें वर्ष असल्याने या वर्षी आठवडाभर राष्ट्रीय खेळ हॉकी जल्लोष साजरा करण्याच्या तयारीत आयोजक मंडळी अग्रेसर झाली आहे. हॉकी स्पर्धेचे सुवर्ण आयोजन करण्याच्या निर्णयाने नांदेडच्या सर्व आजी-माजी खेळाडू आणि प्रेक्षक वर्गात मोठा उत्साह संचारला आहे.
खालसा हायस्कुलच्या मिनी स्टेडियम मैदानावर श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त येत्या दि. 10 जानेवारी रोजी स्पर्धेचे भव्य शुभारंभ होऊन साखळी सामन्यांना सुरुवात होईल. तसेच दि. 17 जानेवारी रोजी अंतिम सामना खेळविला जाणार असल्याची माहिती दुष्ट दमन क्रीडा युवक मंडळ नांदेडचे अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक स. गुरमीतसिंघ नवाब यांनी येथे दिली.
नांदेड येथे वर्ष 1972 पासून श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या जन्मोत्सवास समर्पित राष्ट्रीयस्तरीय हॉकी स्पर्धेचे आयोजन होत आहे. कोविड संक्रमणात वर्ष 2020 चा अपवाद सोडल्यास वरील स्पर्धा सतत खेळविली गेली आहे. यंदा हॉकी स्पर्धेचा 50 वां वर्ष असल्यामुळे स्पर्धेच्या आयोजनास विशेष महत्व प्राप्त झाले आहे. नांदेड सारख्या शहरात मागील 50 वर्षांपासून ही स्पर्धा सातत्य टिकवून आहे हे एक इतिहास घडले आहे.
या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू सहभाग करतात. देशातील मोठे आणि नावलौकिक असलेले संघ शहरात येऊन आपले खेळ-कौशल्याचे प्रदर्शन करतात. महाराष्ट्रात सतत आठवडाभर चालणारी ही एकमेव हॉकी स्पर्धा आहे. असे उल्लेख करत गुरुमितसिंग नवाब पुढे म्हणाले की, या स्पर्धा आयोजनात शिरोमणी दुष्ट दमन क्रीडा युवक मंडळ आयोजन समितीतील सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच सल्लागार तीन महिन्यापासून तयारीला सुरुवात करतात.
उपाध्यक्ष जितेंदरसिंघ खैरा, सचिव हरविंदरसिंघ कपूर, कोषाध्यक्ष हरप्रीतसिंघ लांगरी, सहसचिव संदीपसिंघ अखबारवाले, सदस्य महिन्दरसिंघ लांगरी, जसपालसिंघ काहलों, अमरदीपसिंघ महाजन, विजय नंदे, प्रा. जुझारसिंघ सिलेदार, सरदार खेमसिंघ यांचे परिश्रम खूप कामी येते. तसेच गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड संस्था, गुरुद्वारा श्री लंगर साहिब,
गुरुद्वारा नानक झिरासाहेब बिदर, नांदेड महानगर पालिका, पुलिस प्रशासन, खालसा हायस्कुल, श्री हजुर साहिब आय.टी.आय. आणि शहरातील खेळाडू आणि सेवाभावी नागरिकांचे मोठे सहकार्य मिळते. सामने पाहण्यासाठी नांदेडचा नव्हे तर इतर शहरातून प्रेक्षक पोहचतात.
एकूणच पाच दशकं जुनी हॉकी स्पर्धा या वर्षी एक नवा उत्साह देऊन जाईल यात शंका नाही. नांदेडच्या सर्व खेळाडू आणि नागरिकांनी हॉकीचे सामने पाहून आनंद द्विगुणित करावा असे आह्वान सरदार गुरमीतसिंघ नवाब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.
हॉकी इंडियाच्या नियमानुसार वरिल स्पर्धेत एकूण सोळा संघ सहभागी होणार आहेत. त्यात ए.एस.सी. जालंधर, पंजाब पोलीस, एसजीपीसी अमृतसर, ईस्टर्न रेलवे कोलकाता, साईं एक्सेलेंसी सुन्दरगढ, सैफई इटावा, कस्टम मुंबई, एमपीटी मुंबई, रिपब्लिकन मुंबई, साईं एक्सेलेंसी औरंगाबाद, पुणे डिवीजन, दिल्ली यूनिवर्सिटी, आर्टलेरी नासिक, अमरावती, युथ खालसा नांदेड व नांदेड हॉकी संघ या संघाचा सहभाग राहील.
स्पर्धेतील पहिला पारितोषिक रोख एक लाख रूपये आणि गोल्ड रोलिंग ट्रॉफी देण्यात येईल. द्वितीय पारितोषिक 51 हजार रूपये रोख आणि सिल्वर कप रोलिंग चषक आणि तीसरे पारितोषिक 11 हजार रूपये रोख आणि मोमेंटो प्रदान करण्यात येईल. शिवाय बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, मैन ऑफ द मैच व इतर पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे