गणेश तळेकर
बघा पटल तर…गणेशोत्सव जवळ येतोय कोकण आणि गणेशोत्सव याचं एक वेगळं नात आहे. आवर्जून गणेशोत्सवासाठी गावी हजेरी लावली जाते. हे नातं आणखी घट्ट व्हावे म्हणून फक्त एक करा. गणेशोत्सवासाठी लागणारी शक्य असलेली सर्व खरेदी गावीच करा. मुंबईतून मूर्ती, मखर, रोषणाई सर्व गोष्टी घेऊन जायचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे खर्च झालेला सर्व पैसा मुंबईतल्या व्यापाऱ्यांना मिळतो. तोच पैसा कोकणात जाईल. सर्वच गोष्टी गावी मिळणार नाहीत, पण शक्य असतील तेवढ्या वस्तू स्थानिकांकडून विकत घ्या.
आपल्या माणसांना श्रीमंत करा. प्रत्येक घर या काळात १०००० एवढी रक्कम खर्च करत असेल असे धरून चाललो तरी करोडो रुपयांचा व्यवसाय कोकणात होईल. तेव्हा आवर्जून या गोष्टीचा विचार व्हावा. पटत असेल तर तुमच्या वाडीच्या व्हाट्सअप्प ग्रुप वर ही पोस्ट शेअर करा. हजारात १० लोकानी आचरणात आणलं तरी माझा कोकण थोडा आर्थिक श्रीमंत होईल. एक कळकळीची विनंती.