सांगली – ज्योती मोरे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला सदर स्पर्धा १८ ते २५ वयोगट व २५ वर्षापुढील अश्या २ गटात स्पर्धा पार पडल्या दोन्ही गटात संपूर्ण सांगली जिल्ह्यातून २०० युवती व महिलांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष आ जयंत पाटील साहेब यांनी भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी ते म्हणाले की सांगली जिल्ह्यातील महिलांच्या वक्तृत्व कलेला वाव देण्यासाठी हा एक प्रयत्न उस्फूर्तपणे पार पडला.
माणसाचे वक्तृत्व उत्तम असेल तर त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा मिळण्यास मदत होते. त्याला नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. बोलणार्याचे विचार हे स्पष्ट मांडण्यासाठी मदत होते.
स्व. राजाराम बापू पाटील यांच्या निधनानंतर सामाजिक जीवनाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुरवातीच्या काळात मला भाषण करणेजरा अवघड जायचे पण लोकांच्या सानिध्यात राहून त्यांची कामे करीत असताना भाषण शैली अवगत झाली.
सहभागी वक्त्यांना स्थानिक विषयवार बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व्यासपीठ उपलब्ध करून देईल.
महिला जिल्हाध्यक्षा सौ. सुस्मिता जाधव व त्यांच्या सहकारी भगिनींचे मी या स्तुत्य उपक्रमासाठी अभिनंदन करतो असे ही ते म्हणाले. यावेळी आ. अरुण लाड, आ.मानसिंग नाईक, आ सुमनताई पाटील , संजयजी बजाज, अविनाश काका पाटील, बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील,सुरेश पाटील, राहुल पवार आदी प्रमुख व राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या शहर व ग्रामीण च्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
१८ ते २५ वयोगट
१ श्रेया झांबरे – प्रथम
२ श्रेया देशमुख – द्वितीय
३ श्रद्धा पवार – तृतीय
४ ऋतुजा कदम – उत्तेजनातर्थ
५ स्नेहल पाटील – उत्तेजनातर्थ
६ भूमी कदम – उत्तेजनातर्थ
२५ वर्षापुढील वयोगट
१ अलिशा मोहिते – प्रथम
२. अश्विनी वडगावे – द्वितीय
३. योगिता माने – तृतीय
४ सुप्रिया जोशी – उत्तेजनार्थ
५ पौर्णिमा दानोळे – उत्तेजनातर्थ
६ सुप्रिया माळकर -उत्तेजनातर्थ
७ सरिता कदम -उत्तेजनातर्थ