गडचिरोली – मिलिंद खोंड
कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर आलापल्ली येथील नागरिकांच्या मालमत्तेबाबत भूमी अभिलेख कार्यालयाकडून पुनर्रचौकशी करून जमीन मोजणीच्या कामाला शुभारंभ करण्यात आले आहे.
त्यामुळे आलापल्लीकरांना आता मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) मिळन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आलापल्लीतील बजरंग चौक येथून जमीन मोजणीच्या कामाला सुरुवात करण्यात आले असून मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या आलापल्लीकरांना आता मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) मिळणार आहे.
आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच संचालक भूमि अभिलेख संलग्न जमाबंदी आयुक्त (नागरी भूमापन) पुणे यांच्याशी संपर्क साधून अहेरी तालुक्यातील आलापल्लीवासीयांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी तात्काळ पाऊल उचलण्याचे निर्देश दिले होते.
त्याअनुषंगाने विष्णु शिंदे उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर प्रदेश नागपूर आणि नंदा आंबेडकर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज अंभोरे, शिरस्तेदार तसेच सर्वेयर समय्या बोमनवार यांच्याकडून पुनर्रचौकशी तसेच जमीन मोजणीचे काम केले जात आहे.