Monday, December 23, 2024
HomeMarathi News TodayHera Pheri 3 मध्ये अक्षय कुमारचे पुनरागमन...कार्तिक आर्यनचे काय झाले?...

Hera Pheri 3 मध्ये अक्षय कुमारचे पुनरागमन…कार्तिक आर्यनचे काय झाले?…

न्युज डेस्क – चाहते ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो चित्रपट म्हणजे Hera Pheri 3 या चित्रपटाची, हेरा फेरी 3 या चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. तसेच काही काळापूर्वी अक्षय कुमार या फ्रँचायझीमधून बाहेर पडल्याचे बोलले जात होते, मात्र तसे नाही. अक्षय कुमार ‘हेरा फेरी’ या चित्रपटाच्या तिसऱ्या भागामध्ये परतला आहे. पुन्हा एकदा अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी हे त्रिकूट पडद्यावर दिसणार आहे. यासोबतच अक्षय कुमार हेरा फेरी ३ चा भाग बनला आहे.

हेरा फेरी 3 चे शूटिंग सुरु झाले आहे. स्क्रिप्ट न आवडल्याने अक्षयने गेल्या वर्षी चित्रपट सोडला होता. तसेच अक्षयचा ‘भूल भुलैया 2’ हिट होताच कार्तिक आर्यनला अक्षय कुमारचा च्या ठिकाणी घोषित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. ताज्या माहितीनुसार, कार्तिक आर्यन यापुढे ‘हेरा फेरी 3’चा भाग असणार नाही.

नीरज व्होरा लिखित ‘हेरा फेरी’ या कथेवर दिग्दर्शक प्रियदर्शनने एक अप्रतिम विनोदी चित्रपट बनवला आहे. ‘हेरा फेरी’ चित्रपटात खूप कॉमेडी आहे, ज्याला पाहून लोकांना पोट धरून हसायला भाग पडले. या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाने लोकांचे भरपूर मनोरंजन केले.

यानंतर या चित्रपटाचा सिक्वेल ‘हेरा फेरी 2’ म्हणजेच ‘फिर हेरा फेरी’ सहा वर्षांनंतर प्रदर्शित झाला. या चित्रपटानेही पहिल्या चित्रपटाप्रमाणे बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. तसेच यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज वोरा यांनीच केले आहे.

फिरोज नाडियादवाला बऱ्याच दिवसांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमनाची तयारी करत आहेत. तसेच जेव्हा ‘हेरा फेरी 3’ मधून अक्षय कुमार एक्झिट झाल्याची बातमी आली तेव्हा सुनील शेट्टीला सर्वाधिक धक्का बसला. तसेच सुनीलने सांगितले की, ‘हेरा फेरी 3’ एकतर अक्षय कुमारसोबत बनवणार की नाही. या चित्रपटासाठी अक्षयच्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनचीही चर्चा होती, मात्र कार्तिकने अधिकृतपणे चित्रपट साइन केला नाही.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: