अहेरी – मिलिंद खोंड
श्री रामजन्मभूमी अयोध्यातून आलेल्या पवित्र अक्षता कलशाचे मंगळवारी, 28 नोव्हेंबर रोजी आलापल्लीत विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते व रामभक्तांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी मूलचेरा मार्गावरील मोद्दुमडगु येथील काली मंदिरातून वीर बाबुराव या मुख्य चौकातून श्रीराम मंदिर पर्यंत कलशाची विधिवत पूजन करून वाजतगाजत जय श्रीराम चा उद्गोष करत रॅली करण्यात आली.यावेळी मोठ्या प्रमाणावर मातृशक्ती सुद्धा उपस्थिती होती.
अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी येथे साकारलेल्या भव्य मंदिरात २२ जानेवारी रोजी श्री रामलला विराजमान होत आहे. या सोहळ्यात देशातील सर्व हिंदू कुटुंबांना या पवित्र अक्षता देऊन आमंत्रित करण्यात येणार आहे. याकरिता रामजन्म भूमी तिर्थक्षेत्राच्या वतीने देशभरात अक्षता कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या अक्षत कलशाचे मंगळवारी दुपारच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातुन आल्लापल्ली येथे आगमन झाले. श्रीराम मंदिरात हा अक्षता कलश मातृशक्तीच्या हस्ते पूजन करून, आरती करून दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. रामजन्मभूमीसाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना या अक्षताचे वाटप करून अयोध्या येथील राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला निमंत्रित करण्यात येणार आहे.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सीताराम सोननिया,जिल्हा मंत्री अमित बेझलवार, यांच्यासह विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी व स्वयंसेवक तथा मातृशक्ती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.