मूर्तिजापूर – नरेंद्र खवले
श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येणाऱ्या २२ जानेवारीला होत असून,त्यानिमित्त अक्षयरुपी निमंत्रण देण्यासाठी अक्षतकलशाचे मूर्तिजापूर येथे आगमन झाले.संपूर्ण मुर्तीजापुर नगरीतून वारकरी संप्रदायिक परंपरेने टाळ मृदुंगाच्या गजरात अक्षत कलशाची शोभायात्रा काढण्यात आली.
या शोभयात्रे मध्ये रथामध्ये श्रीराम लक्ष्मण सीता यांची मूर्ती विराजमान करण्यात आले. या शोभयात्रे मध्ये 5 ते 6 हजार श्रीराम भक्त नि हजेरी लावून शोभयात्रेची शोभा वाढवली. शोभायात्रे ही श्रीराम मंदिर जुनी वस्ती येथून प्रारंभ होऊन मुख्य रस्त्याने रामाश्रय चौक,टांगा चौक,मोरारजी चौक,भगतसिंग चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,रेल्वे स्टेशन विभाग,मरी माता मंदिर चौक,श्रीराम मंदिर स्टेशन विभाग,सराफा लाईन येथून बियाणी जिन येथे अक्षत कलश यात्रेचा समारोप करण्यात आला.या यात्रेत टाळकरी मंडळी,महिला भजनी मंडळी सहभागी झाले होते.यानंतर शोभायात्रेची सांगता करण्यात आली.