अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातल्या महाराष्ट्र जिवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी २९ वर्षीय तरुणीला शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला दाखल केली होती. या तक्रारीनंतर विनय भंगाचा गुन्हाही दाखल झाला मात्र या प्रकरणात जीवन प्राधिकरणाचे प्रभारी मुख्य अभियंता संतोष गव्हाणकर यांनी कोणतेही कारवाई केली नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
याबाबत प्रभारी मुख्य अभियंता गव्हाणकर यांच्याशी संपर्क केला असता उडवा उडवीचे उत्तर देत आम्हाला पोलिसांकडून FIR मिळाला नसल्याने आम्ही कारवाई केली नाही. मात्र गुन्हा दाखल होऊन १५ दिवस उलटून गेले असता त्यांच्यावर कोणतेही कारवाही विभागाकडून करण्यात आली आही. अभियंता राजेंद्र इंगळे हे जमानत मिळविण्यासाठी अकोला कोर्टात चकरा मारत असून सुद्धा गव्हाणकर साहेबांना या बद्दल माहित कसे नाही? त्यातच फिर्यादीने याला जमानत देवू नये असा विनंती अर्ज कोर्टात सादर केल्याने आरोपी राजेंद्र इंगळे यास जमानत मिळणे कठीण झाले आहे.
या प्रकरणातील आरोपी अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्याविरोधात बर्याच तक्रारी समोर येत असून सुद्धा गव्हाणकर साहेब त्यांना विशेष वागणूक देत असल्याचे अकोट येथील तक्रारदाराचे म्हणणे आहे. मागील वर्षी शाखा अभियंता इंगळे यांचा मनमानी कारभार व अश्लील शिवीगाळ करून कामगारांना विदाऊट नोटीस देऊन कामावर कमी केल्याप्रकरणी कामगारांनी यांची अकोला जिल्हाधिकारी याना तक्रार केली होती. राजेंद्र इंगळे यांना पाठी घालणाऱ्या प्रभारी मुख्य अभियंता गव्हाणकर यांना प्रश्न विचारत आहेत….
१) श्री राजेंद्र अमृतराव इंगळे यांची बदली त्यांच्या गैरवर्तुणकी वरून अकोट येथून अंजनगाव सुर्जी येथे करण्यात आली होती काय?
२) ते पुन्हा तक्रारींना वाव देणार नाहीत व पुन्हा तक्रार निर्माण करणार नाहीत या हमीपत्रावर सहानुभूतीने त्यांना मूर्तिजापूर येथे आपल्या अहवालानुसारच अकोला या उपविभागात परत बदली करण्यात आली आहे काय?
३) त्यांच्यावर 420 या प्रकारचे कलम पोलीस स्टेशन चान्नी पोलिसात दाखल आहेत व सदर प्रकरण कोर्टात आहे हे आपणास माहीत असून सुद्धा त्यांच्यावर आपणाकडून कोणती कारवाई झाली नाही?
४) त्यांचे विरुद्ध अनेक तक्रारी असूनही कामगारांना कामावरून काढून टाकून सामाजिक प्रश्न तयार करीत आहेत?
५) हे शाखा अभियंता त्यांच्यावर अनेक आक्षेप असूनही त्यांना आपल्याकडून अकोट विभागाचा चार्ज दिला आहे व त्यांच्याकडे मूर्तिजापूर अकोट उपविभाग मिळून जलमिशनचा 8 योजना, तीन मेंटेनन्सच्या योजना इतका कामाचा बोजा ते घेऊ शकतात काय व कामांना न्याय देऊ शकतात काय?
६) ते कर्मचारी व योजनेवरील कामगार यांच्याशी अरेरावी करतात?
७) आपल्या मंडळा अंतर्गत हे एकमेव शाखा अभियंता आहेत काय?
८) त्यांनी अकोट येथे चार्ज घेऊन सहा कामगारांना कामावरून काढले आहे व त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे याकडे आपले लक्ष नाही का?
९) मूर्तिजापूर येथे त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे आपणास हे माहीत असून सुद्धा आपण काही कारवाई केली का?
१०) अशा कर्मचाऱ्यांना विभागाच्या बाहेर बदली करतील किंवा निलंबित करतील काय?…
अभियंता इंगळे यांची अकोट येथुन बदली होण्यासाठी नागरिकांकडून अनेक प्रयत्न होत आहेत परंतु राजेंद्र इंगळे यांचा एक मसीहा अधिकारी आहे जो मुंबई जाऊन बदली टाळण्याचा प्रकार करीत असल्याची चर्चा आहे. तो अधिकारी कोण आहे?. लवकरच त्या अधिकार्याचा भांडाफोड अकोटच्या नागरिकांकडून होणार असल्याची चर्चा आहे.