आकोट – संजय आठवले
Akot : कुटुंबीयांसोबत असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन बारा वर्षीय मुलीवर बलात्कार करणे तिला फूस लावून पळविण्याचा गुन्हा दाखल होऊन अकोला न्यायालयात बंदिस्त असलेल्या अंकित महादेव खोब्रागडे राहणार पोपटखेड तालुका अकोट यांनी केलेल्या जामीन अर्ज आकोट न्यायालयाने फेटाळून लावले आहे आरोपी हा दि.१३.४.२०२४ पासून अकोला कारागृहात बंदिस्त आहे.
या घटनेची हकीगत अशी कि, पिडीतेच्या आईने दि. ८.४.२०२४ रोजी पो.स्टे. रामदास पेठ जि. अकोला येथे आरोपी अंकित महादेव खोबरागडे विरुध्द फिर्याद दाखल केली होती. परंतु घटनास्थळ हे आकोट तालुक्यातील असल्याने गुन्हयाचा तपास आकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला. उपरोक्त फिर्यादीनुसार आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तथा या प्रकारणातील तपास अधिकारी विष्णु बोडखे यानी वरील प्रमाणे अपराध दाखल करून तपासात घेतला.
पिडीतेच्या आईने फिर्यादीमध्ये नमुद केले कि, पिडीता मुलगी १२ वर्षाची असुन ६ व्या वर्गात शिकत आहे. आरोपी अंकित खोबरागडे याला घरातील सर्व सदस्य ओळखतात. त्याचे आमच्या घरी नेहमी येणे जाणे होते. दि.२८.२.२०२४ व दि. १.३.२०२४ रोजी आरोपीने पिडीतेला गावातील एका महिलेच्या घरामध्ये नेले. ती महिला घरामध्ये दारु पिऊन पडलेली होती. ती शुध्दित नसल्याने अंकितने पिडीते सोबत शारिरीक संबंध प्रस्थापीत केले. आपल्या बयानामध्ये पिडितेने देखील पिडीतेने हे नमुद केले आहे.
पिडीत मुलीचे बयान प्रथम वर्ग न्यायाधिश तसेच अध्यक्ष बाल कल्याण समिती अकोला यांचेकडे देखील नोंदविण्यात आले. या गुन्हयाचे तपासात पिडीत मुलीचा शोध घेतला असता पिडीत मुलगी ही एकटीच बडनेरा रेल्वे स्टेशनवर जिआरपी पोलीसांना मिळून आली. पोलीस स्टाफ व पिडीतेचे आई वडील यांना पाठवुन पिडीत मुलीला आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले. अशा प्रकारे पिडीत मुलगी ही अज्ञान असल्याचे माहित असुन सुध्दा आरोपी अंकित खोबरागडे यांने तिचेशी जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्तापित केले व तीला फुस लावुन नेले.
या आरोपाखाली अंकितला अकोला कारागृहात ठेवण्यात आले. तेथूनच त्याने आपल्याला जामीन मिळणेकरिता आकोट जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला. त्यावेळी सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी या जमीनास तीव्र विरोध केला.त्यानी न्यायालयात नमुद केले की, सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे. आरोपीस जमानत दिल्यास तो साक्षीदार लोकांवर दबाव टाकून,त्यांना धमकाऊन साक्ष देण्यापासुन परावृत्त करु शकतो.
त्याला जमानत दिल्यास कायदयाचा धाक राहणार नाही. आरोपी फिर्यादीवर दबाव टाकून तपासात अडथळा निर्माण करु शकतो. तो फरार होण्याचीही शक्यता आहे. पिडीता व आरोपी हे एकाच गावात राहत असल्याने आरोपी तीला धमकी देवुन पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याने पिडीतेच्या मानसीकतेवर परिणाम होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आरोपीचा जमानत अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तीवाद सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर आकोट जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी आरोपीचा जमानत अर्ज फेटाळून लावला.