अकोट – संजय आठवले
दि. ०१ जानेवारी, ते १५ जानेवारी, २०२५ ह्या पंधरा दिवसांत शासनाने दिलेला “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा कार्यक्रम आकोट तालुक्यातील सर्व ग्रंथालयांना राबवायचा आहे.
ह्याबाबत आकोट तालुक्यातील ग्रंथालयांच्या कार्यकर्त्यांची बैठक नवयुग वाचनालय, तहसिल रोड, आकोट येथे दि. ०२ जानेवारी, २०२५ गुरुवार रोजी दुपारी २ वाजता आयोजीत करण्यात आली होती. सदर बैठकी मध्ये शासनाने दिलेले निर्देश सांगणे, त्यावर चर्चा करणे व कार्यक्रम निश्चित करणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठक मोहन आसरकर, अध्यक्ष, नवयुग वाचनालय, आकोट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीत सोनाजी महाराज सार्वजनिक वाचनालय, जऊळका वरूर, विरशैव सार्वजनिक ग्रंथालय, मुंडगाव, विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, बळेगांव, मनमोहन सार्वजनिक वाचनालय, सौंदळा, श्री रामचंद्र महाराज सार्वजनिक वाचनालय, वणी,
मौलाना आझाद सार्वजनिक वाचनालय, आकोट, श्रीराम सार्वजनिक वाचनालय, आसेगांव बाजार, जनजागृती सार्वजनिक वाचनालय, शिवपूर, सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, कावसा बु. ईत्यादी वाचनालयांचे पदाधिकारी हजर होते.
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा राबविण्यासाठी विविध कार्यक्रम एकमेकांनी सुचविले व कार्यक्रम ठरविण्यात आले. आभार प्रदर्शन व चहापानानंतर बैठक समाप्त झाली.