Tuesday, December 24, 2024
HomeSocial Trendingसोशल मीडिया ग्रुप ॲडमिन्सना आकोट पोलिसांचे सूचना पत्र…समाजद्रोही मेसेजेस टाळा…कायदा व सुव्यवस्था...

सोशल मीडिया ग्रुप ॲडमिन्सना आकोट पोलिसांचे सूचना पत्र…समाजद्रोही मेसेजेस टाळा…कायदा व सुव्यवस्था पाळा…

आकोट- संजय आठवले

येत्या आठवड्यात साजऱ्या होणाऱ्या महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव, रमजान ईद, परशुराम जयंती, अक्षय तृतीया या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आकोट शहर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन होण्याचे दृष्टीने सोशल मीडिया ग्रुप ऍडमिन्सना सूचना पत्र जारी करून समाजद्रोही मेसेजेसचे आदान-प्रदान टाळणे बाबत सूचित केले आहे.

आकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी जारी केलेल्या या सूचनापत्रात म्हटले आहे कि, सदर उत्सव शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्याचे दृष्टीकोनातुन सोशन मिडीया जसे की Whats App, Facebook, Instagram, Twitter इत्यादी माध्यमातुन आक्षेपार्ह मजकुर, व्हिडीओ टाकणा-यांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने लक्ष ठेवण्यात येत आहे. समाज कंटकाकडुन सोशल मिडीयाचे माध्यमातुन चुकिचे संदेश व अफवा पसरविल्या जातात. त्यातुन दोन समाजात तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारांना आळा घालण्याकरिता पोलीसांचा सोशन मिडीयावर वॉच राहणार असुन अफवा पसरविणा-यां विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

काही दिवसांपुर्वी महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात घडलेल्या घटनांबाबत लोक चुकीचे संदेश प्रसारीत करीत असुन, त्यापासुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या बाबत कोणत्याही सोशल मीडिया ग्रुप वरून कोणत्याही प्रकारचे प्राप्त मेसेज कुणीही प्रसारीत करू नये. आकोट शहरात उत्सव प्रसंगी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे उद्देशाने आक्षेपार्ह संदेश, छायाचीत्रे, अफवा, खोटया बातम्या प्रसारीत करून सार्वजनीक शांतता व सुव्यवस्थेत बाधा निर्माण करणा-या अशा समाजकंटकांविरूध्द पोलीस प्रशासनाचे वतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

दिनाक २२/०४/२०२३ रोजी आकोट शहरात बसवेश्वर महाराज जन्मोत्सव, अक्षय तृतीया, रमजान ईद, परशुराम जयंती हे सण, उत्सव शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्याचे दृष्टीकोनातुन सोशल मीडिया ग्रुप अॅडमीन्स यांनी आपल्या Whats App ला Only Admin Can Send Massage असे सेंटीग करून आपले ग्रुप वरून कोणत्याही अफवा किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचा मजकुर प्रसारीत होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

या उपरहि देखील दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करून या सण, उत्सव प्रसंगी कोणत्याही ग्रुपच्या सदस्यांकडुन कोणत्याही प्रकारच्या अफवा प्रसारित झाल्यास किंवा दोन भिन्न जाती-जमाती मध्ये जातीय तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह संदेश, छायाचित्रे, अफवा, खोटया बातम्या प्रसारीत झाल्यास व त्यावरून आकोट शहरात सार्वजनीक शांततेस व सुव्यवस्थेस बाधा होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी ग्रुप ॲडमिन्स व संबंधीत व्यक्तीस (मेसेज प्रसारीत करणारा) जबाबदार धरण्यात येवुन संबंधीताविरूध्द प्रचलित कायदयानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदरची नोटीस त्यांचे विरूध्द न्यायालयात पुरावा म्हणुन सादर करण्यात येईल. ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी दिलेल्या या नोटीसमुळे आता सोशल मीडिया ग्रुप ॲडमिन्सना दक्ष राहणे गरजेचे झाले आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: