Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीआकोट नगर परिषद लेखा परिक्षकाला मारहाण...कंत्राटदारावर गुन्हा दाखल

आकोट नगर परिषद लेखा परिक्षकाला मारहाण…कंत्राटदारावर गुन्हा दाखल

आकोट- संजय आठवले

आकोट नगर परिषदेच्या लेखा परिक्षकाला १२ लाखाचे देयक तपासुन देण्याकरिता मारहाण केल्याप्रकरणी तक्रारीनंतर एका कंत्राटदाराविरुध्द आकोट पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

आकोट नगर परिषदेचे लेखा परिक्षक तथा प्रभारी कार्यालय पर्यवेक्षक सागर दिनकरराव पहुरकर रा.तेल्हारा यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की,आकोट नगर परिषद कार्यालयीन कामकाज आटोपुन १४ नोव्हेंबरला ते सायंकाळच्या सुमारास घरी जाण्याकरीता निघाले होते,नगर परिषद परिसरातील अग्नीशमन कार्यालयाजवळ दिनेश नागापुरे रा. अकोला याने हरिष सिंदखेडकर याचे देयक सकाळपासुन का काढले नाही अशी विचारणा करुन त्याना अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली.

त्यामुळे त्यांचे उजव्या डोळ्याला इजा पोहचली. त्यानंत “तु नगरपरिषदेमध्ये कसे काम करतो मी पाहतो,तेल्हारा जातांना लोहारी मार्गाने ये-जा करतो ना” अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. आणि हरिष सिंदखेडकर याची सुरक्षा ठेव व ञयस्त पक्षाच्या अहवालाची रक्कम अंदाजे १२ लक्ष रुपयाचे देयक काढण्यासाठी पहुरकर यांचेवर दबाव टाकला. सदर देयक आजच तपासुन दे म्हणत मारहाण केली, अशा आशयाच्या फिर्यादीवरुन आरोपी दिनेश नागापुरे रा.अकोला याचे विरुध्द भादविच्या ३५३,३३२,५०४,५०६ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असुन अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत .

कर्मचारी संघटना आक्रमक:अटकेची मागणी महाराष्ट्र नगर परीषद व नगर पंचायत कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटना राज्याचे उपाध्यक्ष प्रदिप रावणकर यांचे नेतृत्वात आकोट नगर परिषद प्रशासकीय इमारतीच्या पाय-यावर कर्मचा-यांनी एकञीत येत घटनेचा निषेध नोंदवित घोषणा दिल्यात. कंञाटदाराला अटक करण्याची तसेच अशा घटनेची पुनरवृत्ती होऊ नये असा वचक आरोपीवर बसविण्याची मागणी करण्यात आली. तसेच लेखापरिक्षक सागर पहुरकर यांच्या पाठीशी संघटना असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कर्मचारी संघटनेतर्फे दिवसभर काळ्या फिती लावुन कामकाज करण्यात आले. आंदोलनामध्ये महिला-पुरुष संवर्ग अधिकारी,कर्मचारी आदि सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: