आकोट – संजय आठवले
जन्म नाव ‘शरीफ’ आणि ‘प्रेम’ हे बनावट नाव धारण करूनही करणीतून मात्र सैतानाचीच साक्ष देणाऱ्या आणि मलकापूर, नांदुरा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथील रहिवासी सै. शरीफ सै.शफी उर्फ प्रेम पाटील ह्या नराधमाने फेसबुकच्या माध्यमातून एका हिंदू मुलीशी ओळख करवून घेतल्यावर मागील तीन वर्षापासून तिचेवर सातत्याने ब्लॅकमेलिंगसह बलात्कार केल्याने अकोला मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या या नराधमाचा जामीन अर्ज आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
घटनेची हकीगत अशी कि, सै. शरीफ सै. शफी हा कु-हा काकोडा, ता. मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव येथील रहिवासी आहे. याचे नाव शरीफ असले तरी मात्र शरीरातील बदमाशीमुळे हा मलकापूर, नांदुरा जिल्हा बुलढाणा या पोलीस स्टेशन्सचे हद्दीत कुख्यात अपराधी म्हणून कुप्रसिद्ध आहे. या ठिकाणी त्याचेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशातच फेसबुकचे माध्यमातून त्याचा आकोट येथील एका हिंदू मुलीशी संपर्क आला. तिला त्याने आपले नाव प्रेम पाटील असल्याचे सांगितले. त्याला मराठीत चांगले बोलता येते. त्यावरून त्या मुलीला त्याचे म्हणणे पटले.
त्यानंतर त्याने त्या मुलीचे फेसबुक अकाउंट हॅक केले. त्याद्वारे तिचे नातेवाईकांशी संपर्क करून त्यांना व त्या पिडितेला धाकात घेतले. आणि तिचे कडून शरीर सुखाची मागणी केली. एक दोनदा असे संबंध प्रस्थापित झाल्यावर त्याने ह्या प्रणय क्रीडेची चित्रफीत बनविली. परिणामी ही पीडीता त्याचे कचाट्यात पुरती फसली. ह्या चित्रफितीचे आधारे पिडितेला वारंवार धमक्या देऊन त्याने शरीर सुखासह आतापावेतो तिचेकडून ३ लक्ष ७० हजार रुपयांची खंडणी उकळली आहे. या खंडणीचे भरोशावर त्याचे दाणापाणी नीट चालत असल्याने ह्या नराधमाने चक्क आकोट शहरात भाड्याने घर घेऊन वास्तव्य सुरू केले.
सतत तीन वर्षे हा ब्लॅकमेलिंग व बलात्काराचा खेळ अव्याहतपणे सुरू होता. परंतु हे सारे असहनीय झाल्याने सदर पीडितेने मोठे धाडस करून सै. शरीफ उर्फ प्रेम पाटील याची दि. ७ जून २०२३ रोजी आकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावर नवनियुक्त ठाणेदार तपन कोल्हे यांनी तत्काळ दखल घेऊन या सैतानाचे विरोधात गुन्हे दाखल केले. त्याच्या मुसक्या आवळून त्याला आकोट न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला अकोला मध्यवर्ती कारागृहात पाठविण्याचा आदेश दिला. त्यामुळे आज रोजी हा अपराधी अकोला कारागृहात बंदिस्त आहे.
अशा स्थितीत या नराधमाने जामीनाकरिता आकोट जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात सरकारी वकील अजीत देशमुख यांनी न्यायालयात युक्तीवाद केला कि, आरोपी सै. शरिफ ने केलेला गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरुपाचा आहे. याने मुस्लीम असुनही पिडीतेला स्वतःचे नाव प्रेम पाटील सांगून व तिची फसवणूक करुन तीला जाळ्यात ओढले. त्यानंतर तिचेशी जबरीने संभोग केला.
त्या शारिरीक संबंधाचे चित्रिकरण व्हायरल करण्याची व जिवे मारण्याची धमकी देवुन त्याने पिडिते कडून ३,७०,००० रु. ची खंडणी वसुल केली. या प्रकरणात आरोपीला जामीन मिळाल्यास पिडीत मुलीला तो पुन्हा मानसीक व शारिरीक त्रास देण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिडीत मुलगी आधीच त्याच्या मानसीक दडपणा खाली आहे. जामिनानंतर पिडीता व तीचे कुटूंबीयांचे जिवीतास धोका निर्माण होण्याचीही दाट शक्यता आहे.
आरोपी हा आकोट येथेच भाडयाच्या घरात राहत आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असुन त्याचेवर पो.स्टे. मलकापूर, पो.स्टे. नांदूरा येथे गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे आरोपी सै. शरीफ सै. शफी याचा जमानत अर्जनामंजुर करावा. अशी विनंती सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांचे युक्तीवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधिश चकोर बावीसकर यांनी आरोपीचा या प्रकरणातील जमानत अर्ज नामंजुर केला.