Sunday, December 22, 2024
Homeराज्यआकोट न्यायालयाने फेटाळला गाईची चोरी व मांस विक्री करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज…

आकोट न्यायालयाने फेटाळला गाईची चोरी व मांस विक्री करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज…

आकोट – संजय आठवले

गाईची चोरी व कत्तल करून मास विक्री करण्याचे आरोपात आकोट ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला फरार आरोपी जमीरुद्दीन उर्फ जम्मू-अलीमुद्दीन ह्याने अटकपूर्व जामीनाकरिता केलेला अर्ज आकोट सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी फेटाळला असून आकोट ग्रामीण पोलीस या आरोपीसह त्याचा साथीदार सय्यद मुजाहिद सय्यद मोहसिन याचाही शोध घेत आहेत.

या प्रकरणाची हकीकत अशी कि, सुनील महादेवराव सावरकर रा. चंडिकापूर यांनी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली कि, त्याचे बैल, ३ गाई व २ वासरे चोरी झालेले आहेत. त्यावरून आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख यांनी गुन्हा दाखल केला.

आरोपींचा शोध घेतला असता कुदरत खाॅं उर्फ जावेद एहसान खान रा..आकोट, रमीज राजा उर्फ सोनू अब्दुल नजीर पटेल रा. वडाळी सटवाई, फिरोज खान रफिक खान रा. अंजनगाव यांना अटक करण्यात आली. परंतु पाचवा आरोपी जमीरुद्दीन अलीमुद्दीन रा. आकोट हा फरार झाला. अशा स्थितीतच त्याने आकोट जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनाकरिता अर्ज केला.

या प्रकरणात सरकारी वकील अजित देशमुख यांनी सरकारतर्फे न्यायालयात युक्तीवाद केला कि, या गुन्ह्याचे तपासात निष्पन्न आरोपी कुदरत खाँ उर्फ जावेद अहेसान खाँ वय २२ वर्ष रा. मजेठीया प्लॉट आकोट यांने वरील गुन्ह्याची कबुली दोन पंचासमक्ष दिली आहे. गुन्ह्यात चोरुन नेलेल्या गाईची कत्तल करुन मास विक्री केल्याचे ठिकाणही त्याने दाखविले आहे.

त्यासोबतच गाईची कत्तल करुन विक्री केलेले ४,००० रु. पंचासमक्ष काढुन दिले आहेत. जे पुराव्याकरीता ताब्यात घेतले आहेत. यातील दुसरा आरोपी नामे रमीज राजा उर्फ सोनु अब्दुल नसीर पटेल वय २२ वर्ष रा. ग्राम वडाळी सटवाई ता. आकोट जि. अकोला या आरोपीने देखिल वरील गुन्ह्याची कबुली दोन पंचासमक्ष दिली. गुन्ह्यात चोरुन नेलेल्या गाईची कत्तल करुन विक्री केलेले ५,००० रु.ही त्याने दिले. ते देखिल पोलीसांनी पुराव्याकामी जप्त करुन पंचानामा करुन ताब्यात घेतले.

या दोन्ही आरोपींनी या गुन्ह्यातील साथीदार आरोपी नामे फिरोज खान रफिक खान वय ४१ वर्ष रा. उस्मान पुरा, बुधवारा अंजनगांव सुर्जी याला देखिल पोलीसांनी अटक केले आहे. त्याने गुन्हा करतेवेळी सोबत असलेले त्याचे साथीदार मुजाहीद रा. आकोट व जम्मू उर्फ जमिरोद्दिन रा. आकोट यांची नावेही पोलीसांना सांगितली आहेत.

त्यावर पोलीसांनी फरार आरोपी जमिरोद्दिन उर्फ जम्मु अलीमोद्दिन रा. ताहपुरा आकोट येथे जावुन विचार पुस केली असता हा आरोपी फरार झाल्याने मिळुन आला नाहीं. पुढे सरकारी वकील अजित देशमुख यांनी युक्तीवादामध्ये कोर्टासमोर सांगितले कि, आरोपी जमिरोद्दिन उर्फ जम्मु अलीमोद्दिन याने गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला आहे. आकोट शहर हे अति संवेदनशिल आहे.

या आरोपींनी हिंदु समाजाच्या गाई व बैलांची कत्तलीसाठी चोरी केली असल्याने सदर प्रकरण संवेदनशिल बनले आहे. या गुन्ह्यातील अर्जदार आरोपीने या अगोदर पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन व इतर ठिकाणी किती गोवंश जातीचे जनावरांची चोरी व कत्तल केली, कोणास विक्री केली, त्याची कशी विल्हेवाट लावली याबाबत सखोल विचारपुस करण्याकरीता या आरोपीची पोलीस कोठडीमध्ये विचारपुस होणे आवश्यक आहे.

तसेच या गुन्ह्यातील हा अर्जदार आरोपी गुन्हेगार प्रवृत्तीचा असुन याचे विरुध्द पोलीस स्टेशन आकोट शहर येथे गोवंश जातीची जनावरे चोरणे, तसेच अन्य चोरीचे व इतरही गुन्हे दाखल असुन यावर न्यायालयामध्ये खटले प्रलंबित आहेत. त्याच प्रमाणे या गुन्ह्यातील अर्जदार आरोपी याचा आणखी १ साथिदार सै. मजुहीद सै. मोहसिन वय २२ वर्ष रा. कागंर पुरा आकोट हा कोठे लपुन बसला ? याचीही विचारपुस करुन त्या साथिदाराला अटक करणे बाकी आहे.

तसेच वरील गुन्ह्या व्यतिरिक्त या पुर्वी दाखल असलेले अपराध नं. ३३१/ २०२२ मधील या अर्जदार आरोपीचे साथिदार यांनी गौवंश जातीची जनावरे चोरीची कबुली दिली आहे. वरील सर्व परिस्थिती व मुद्दे लक्षात घेता सरकारी वकील अजित देशमुख यांनी सरकारतर्फे न्यायालयाला विनंती केली कि, वरील गुन्ह्यातील फरार आरोपी जमिरोद्दिन उर्फ जम्मु अलीमोद्दिन याला अटकपूर्व जामीन दिल्यास तो या प्रकरणातील साक्षीदार यांचेवर दबाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे न्यायालयाने वरील प्रकरणातील अटकपूर्व जमानत अर्ज कृपया नामंजुर करावा. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर आकोट जिल्हा व सत्र न्यायाधिश चकोर बाविसकर यांनी आरोपीचा अटकपूर्व जमानत अर्ज नामंजुर केला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: