Thursday, October 24, 2024
Homeराज्यआकोट न्यायालयाने केली धनादेश अनादरन प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता...

आकोट न्यायालयाने केली धनादेश अनादरन प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता…

आकोट – संजय आठवले

नागपूर येथील आरोपीवर आकोट न्यायालयात दाखल धनादेश अनादरन प्रकरणात न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी आकोट तथा दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आकोट वि.भी. रेडकर यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.

आकोट येथील फिर्यादी सुनील देशमुख यांनी नागपूर येथील संजय लक्ष्मीकांत पाटील यांचे विरुद्ध आकोट न्यायालयात धनादेश अनादरन केल्याप्रकरणी खटला दाखल केला. तब्बल १७ लक्ष ५० हजार रकमेच्या धनादेशाचे अनादरण केल्याचा आरोप करण्यात आला होता.

सदर प्रकरणात न्यायालयाने दोन्ही बाजूंचा विस्तीर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर दिनांक २०/७/२०२३ रोजी फिर्यादीचा दावा फेटाळून लावला. आणि वरील रकमेच्या मागणीचे प्रकरण खारीज करून आरोपी संजय पाटील यांची निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणात आरोपीचे वकील म्हणून आकोट येथील विधीज्ञ रविश व्ही. कुलकर्णी तथा नागपूर येथील विधीज्ञ डी. एस.श्रीमाळी यांनी कामकाज पाहिले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: