देशातील आकाशाला भिडलेली महागाई, वाढती बेरोजगारी, युवकांचे जिवन अंधकारमय करणारी अग्निपथ योजना, जिवनावश्यक वस्तुंवर लावलेला जाचक जिएस टी यांचे विरोधात व अतिवृष्टीने बाधीत शेतक-यांचे समर्थनात आकोट काँग्रेसने उपविभागिय अधिकारी याना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे कि, देशात महागाईने थैमान घातलेले आहे. गरीब लोकाना जीवन जगताना अतिशय अडचणींचा सामना करावा लागत आहे. शंभर दिवसात महागाई कमी करण्याचे केंद्र शासनाचे आवाहन हवेत विरले आहे. महागाई किमान स्थिर तरी राहायला हवी परंतु ती दर दिवशी वाढतच आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, कापड, औषधे, तथा अन्य जिवनावश्यक वस्तु आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. अशा जिवघेण्या स्थितीत केंद्र शासनाने जिवनावश्यक वस्तुंवरही जिएसटी आकारला आहे. ह्या जाचक कराने नागरीकांचे कंबरडे अक्षरशः मोडले आहे.
ह्या अमानुष प्रकारानी नागरिकांचे जगणे मुश्किल झालेले असताना युवकाना रोजगाराची मदत मिळायला हवी. जेणेकरुन प्रपंच कसाबसा चालू शकेल. परंतु केंद्र सरकारने ह्याबाबतही आपलेच वचन पायदळी तुडविले आहे. दरसाल दोन कोटी नोक-या देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. परंतु गत आठ वर्षात १० लाख नोक-याही हे सरकार देवू शकले नाही. ह्या प्रकाराने युवकांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले आहे. नाही म्हणायला केःद्र सरकारने अग्निपथ ही योजना लागू केली आहे. परंतु या योजनेद्वारे युवकांचे भले होण्याऐवजी त्यांचे भवितव्यच अंधकारमय करुन टाकले आहे. चार वर्षांच्या सेवा निवृतौतीनंतर हे युवक पून्हा बेरोजगार होणार आहे. त्यामूळे केंद्र सरकारने कबूल केल्यानुसार महागाई कमी करावी, जीवनावश्यक वस्तुंवरिल जिएसटी हटवावा, युवकांसाठी दरसाल नोक-या ऊपलब्ध करवून द्याव्यात आणि अग्निपथ योजनेऐवजी पूर्वीप्रमाणे सैन्य भरती सुरु करावी अशा मागण्याही ह्या निवेदनात केल्या आहेत.
ह्या सोबतच आकोट तालूक्यातील अतिवृष्टीने बाधीत शेतक-याना ताबडतोब मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या संदर्भातील निवेदनात म्हटले आहे कि, आकोट तालूक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतक-याना सरसकट दर हेक्टरी ७५ हजार रुपये नुकसान भारपाई द्यावी, तथा यावर्षीचे पिक कर्ज माफ करावे. ही दोन्ही निवेदने तालूका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत पाचडे यांचे नेतृत्वात देण्यात आली. या निवेदनावर प्रशांत पाचडे, डॉ. प्रमोद चोरे, सतिष हाडोळे, अनंत गावंडे, गजानन आवारे, रघूनाथ धूमाळे, एड, मनोज खंडारे, गजानन डाफे, संजय भावे, नागेश ईंगळे, प्रकाश मंगवाणी, निनाद मानकर, सै. आसीफ हूसैन, प्रा. संजय बोडखे, गजानन वारकरी, राजाबाबू, राजेश भालतिलक, वैभव पाचडे, सुनिल गावंडे, मयूर निमकर, बाळू ईंगळे, हिरालाल कासदेकर, रतन गूजर, दिपक वर्मा, प्रतिक गोरे, अरुण अंबळकार, विलास घाटोळ, संजय आठवले आदी मान्यवरांच्या स्वाक्ष-या आहेत.