Saturday, September 21, 2024
Homeराजकीयआकोट | ग्रामपंचायत मतमोजणीकरिता प्रशासन सज्ज…महसूल कार्यालयाच्या नूतन इमारतीत होणार मतमोजणी…कोणत्या टेबलवर...

आकोट | ग्रामपंचायत मतमोजणीकरिता प्रशासन सज्ज…महसूल कार्यालयाच्या नूतन इमारतीत होणार मतमोजणी…कोणत्या टेबलवर कोणते गाव असणार?…जाणून घ्या

आकोट- संजय आठवले

आकोट तालुक्यातील ग्रामपंचायत मतदानानंतर दिनांक २०.१२.२०२२ रोजी मतमोजणी करण्यात येत आहे. त्याकरिता प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून या दिवशी सकाळी १० वाजता पासून मतमोजणीस सुरुवात केली जाणार आहे. ही मतमोजणी महसूल कार्यालयाच्या नूतन इमारतीत होणार आहे. त्याकरिता या इमारतीमधील तीन हॉल सज्ज केले असून हॉल क्रमांक १ मध्ये टेबल क्रमांक १ ते ४, हॉल क्रमांक २ मध्ये टेबल क्रमांक ५ ते ८ व हॉल क्रमांक ३ मध्ये टेबल क्रमांक ९ ते ११ राहणार आहेत.

त्यातील टेबल क्रमांक १ वर कालवाडी, करतवाडी, वणी, वारुळा ह्या ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे. टेबल क्रमांक २ वर तरोडा, मरोडा, बांबर्डा, लोतखेड या ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे. टेबल क्रमांक ३ वर देऊळगाव, पुंडा, रोहनखेड, सावरगाव या ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे. टेबल क्रमांक ४ वर रौंदळा, पाटसुल, मुंडगाव, लामकानी या ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे. टेबल क्रमांक ५ वर जीतापूर प्रगणे, अडगाव, नेव्होरी बुजुर्ग, बेलूरा, शहापूर रुपागड या ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे. टेबल क्रमांक ६ वर वस्तापूर मानकरी, महागाव, दिवठाणा या ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे.

टेबल क्रमांक ७ वर नखेगाव, करतवाडी रेल्वे, रेल या ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे. टेबल क्रमांक ८ वर अकोलखेड, वडगाव मेंढे, अकोली जहागीर ह्या ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे. टेबल क्रमांक ९ वर टाकळी खुर्द, टाकळी बुजुर्ग, धारेल या ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे. टेबल क्रमांक १० वर जळगाव नहाटे, लोहारी खुर्द, वडाळी सटवाई या ग्रामपंचायतची मतमोजणी होणार आहे. तर टेबल क्रमांक ११ वर केवळ बळेगाव या एकाच ग्रामपंचायतची मतमोजणी होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: