अकोला : अकोल्याच्या लेकीन जागतिक स्तरावर सौंदर्य स्पर्धेत मोठा मान असलेल्या ‘द ग्लोबल ब्युटी अवॉर्ड्स’मध्ये मराठी मोहोर उमटलीये. मुळची अकोल्याची मात्र आता अमेरिकन नागरिक असलेल्या गार्गी खोडे या सौंदर्यवतीने ‘मोस्ट फोटोजेनिक फेस गटा’त विजेतेपद पटकावलंय.
अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातल्या स्नोकॉलीमी शहरात रविवारी ही स्पर्धा पार पडलीय. अंतिम फेरीतील एकुण 11 सौंदर्यवतींमधून तिची निवड झालीये. तिचे वडील रविंद्र खोडे हे व्यवसायानिमित्ताने अमेरिकेत स्थायिक झालेयेत. याआधी तिने ‘मीस रेडमंड टीन वॉशिंग्टन स्टेट’, मीस टीन ग्लोबल एशिया इंडिया असे किताब पटकावलेयेत. तिच्य् या यशाबद्दल अकोलेकरांनीही आनंद व्यक्त केलाय.