Monday, December 23, 2024
HomeखेळShilpa Meshram | अकोल्याच्या शिल्पा मेश्रामची बुद्धिमत्ता देशभर आणि जगात पोहचली...KBC मध्ये...

Shilpa Meshram | अकोल्याच्या शिल्पा मेश्रामची बुद्धिमत्ता देशभर आणि जगात पोहचली…KBC मध्ये जिंकले लाखों रुपये…

समतानगर तारफैल भागातील ऑटोरिक्षा चालकाची पत्नी शिल्पा मेश्राम बसली हॉटसीटवर आणि जिंकलेही लाखों रुपयांचे बक्षीस

Shilpa Meshram : सोनी टिव्ही वाहिनीवर सुरू असलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांच्या संचालंनाने गाजत असलेला कौन बनेगा करोडपती या शो मध्ये देशभरातील विविध स्तरातील लोक चमकून देशभर पोहचले आहेत. त्यामध्येच अकोल्यातील स्लम परिसर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या समतानगर, तारफाईल भागातील रहिवासी शिल्पा प्रशांत मेश्राम ह्या ऑटो रिक्षा चालकाची पत्नी असलेल्या गृहिणीने कौन बनेगा करोडपती या शो मध्ये प्रवेश मिळवून हॉटसीटवर बसुन महानायक अमिताभ बच्चन यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देवुन बारा लाख पन्नास हजार रुपये जिंकले आहेत. तर या व्यतिरिक्त झटपट प्रश्नाच्या उत्तरात ९० हजार रुपये जिंकले आहेत. शिल्पा मेश्राम यांच्या कौन बनेगा करोडपती या शो मध्ये प्रवेशाने अकोल्याची बुद्धिमत्ता देशभर आणि जगात पोहचली आहे.

सोनी टिव्ही वाहिंनीची चमू अकोल्यात येऊन शिल्पा मेश्राम राहत असलेल्या वस्तीचे, तिच्या घराचे, कुटुंबाची वास्तव चित्रं दाखवणारे व्हिडिओ शूटिंग करून निघून गेले आहेत. शो साठी आवश्यक ती सामग्री पुर्ण करुन आज शुक्रवारी शिल्पा मेश्राम यांच्या ह्या शोचे लाईव्ह प्रसारण झाले आहे. अकोल्यातील गरीब मात्र शिक्षित गृहिणी आणि प्रशांत मेश्राम या ऑटो चालकाची पत्नी शिल्पा मेश्राम यांनी आज अकोल्याचा मान उंचावला आहे. शिल्पा मेश्राम यांनी 12 लाख 50 हजार रूपये कौन बनेगा करोडपती या शो मधून बक्षीस जिंकून आपली बुद्धिमत्ता दाखवून दिली आहे.

ज्ञान, बुद्धिमत्ता कुणाची पाईक नसते,परिश्रम घेतले की ती कुणालाही प्राप्त होऊ शकते हे आज शिल्पा मेश्राम या ताईने सिद्ध करून दाखवले आहे. ऑटो चालवणाऱ्या पतीची दरमहा जेमतेम सात, आठ हजार कमाई असणाच्या या शिल्पा मेश्राम ताईने आपल्या नियोजनामुळे दोन मुलांचा सांभाळ करून उत्तम संसार सांभाळ्ला आहे. घर नाही, त्यामुळे पुढ़चे काहीच नाही पण बुद्धिमत्ता प्रगल्भ असणे या पाठीमागे फक्त ज्ञानसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पुर्ण पणे वाचून काढून त्यांच्या शिकवण नुसार शिका यासाठी कारंजा लाड जवळच माहेर असलेल्या गावातून बी कॉम पर्यंत शिक्षण पुर्ण केले.

मात्र नोकरीच्या शोधासाठी परिक्षा द्याव्या लागतात आणि त्यासाठी महागडी पुस्तके खरेदी करावी लागतात मात्र पतीची कमाई जेमतेम असल्याने परिक्षा फी भरणे किंवा पुस्तके खरेदीसाठी अतिरीक्त खर्च परवडत नसल्याने मोबाईलवरच आपले ज्ञान वृध्दींगत करण्यासाठीं प्रयत्न करीत असताना सोनी टिव्ही वाहिनीवर प्रसारित कौन बनेगा करोडपती या शो साठी विचारलेल्या प्रश्नांची सर्वात जलद उत्तरे देवुन शो साठी प्रवेश मिळवून आपल्या गरिबी हटविण्यासाठी प्रगल्भ बुध्दीचे दार उघडले आणि स्वप्नवत सर्व घडत असताना बिनधास्त पणें महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. महानायक अमिताभ बच्चनशी बोलताना शिल्पा मेश्राम यांचा आत्मविश्वास दांडगा होता, या शिल्पा मेश्राम अन त्यांचा छंद पूर्ण करण्यासाठीच पती प्रशांत मेश्राम यांचेही मोलाची मदत मिळाली आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: