अकोला : वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी भाजपचे लोकप्रिय आमदार स्वर्गीय लालाजी शर्मा यांच्या मृत्यू नंतर डाबकी रोड येथील उड्डाण पुलाचे उद्घाटन अकोला भाजपा कडून करण्यात आल्यावर वंचितचे प्रवक्ते पुंडकर यांनी अकोला भाजपवर टीका करीत ‘किमान तेरा दिवस शोक पूर्ण होऊ द्यायचा होता. दुःखद प्रसंगात उत्सवी उदघाटन आटपून अकोला भाजप ने लोकनेते स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांचा एक प्रकारे अवमानच केला आहे. उपयोगिता संपली की कार्यकर्त्याला विसरून जाणे ही जुनीच परंपरा अकोला भाजप ने राखली असेच म्हणावे लागेल.’ तर आरोपाला प्रत्युत्तर अकोला भाजपा लोकसभा प्रभारी अनुप धोत्रे तसेच लालाजी यांचे सुपुत्र अनुप शर्मा यांनी सोशल मिडीयावर या विषयावर राजकारण करू नये अशी विनंती केली होती.
अकोला भाजपा लोकसभा प्रभारी अनुप धोत्रे यांनी वंचितचे प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना प्रत्युत्तर देत सोशल मिडीयावर पोस्ट टाकीत म्हणाले…”आदरणीय लालाजी हे सर्व कार्यकर्त्यांना पितृतुल्य होते. हा उड्डाण पूल स्व लालाजी यांना समर्पित आहे. सामान्य जनतेच्या सोईकरिता हा उड्डाण पूल आहे.पंतप्रधान मोदीजी यांच्या मातोश्री यांचा स्वर्गवास झाला तेव्हा ते त्याच दिवशी जनसेवेच्या कामाला लागले. येत्या भविष्यात गलिच्छ राजकारण करणाऱ्या लोकांपासून हा जिल्हा मुक्त होवो हीच गजानन महाराज चरणी प्रार्थना…बाकी अकोलेकर जनता ही सुज्ञ आहे”…अनुप धोत्रे, अकोला भाजप लोकसभा प्रभारी.
यावर डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी सोशल मिडीयावर पलटवार करीत लिहले…”अकोला जिल्ह्याच्या विकासात ज्यांनी भोपळा मिळवला आहे आणि केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही एम आय डी सी मध्ये एक साधा प्रकल्प ही जे 20 वर्षात सुरू करू शकले नाही त्यांची वंचितांच्या सत्तेबद्दल बोलायची लायकी नाही. वंचितने कधीही धर्माचे राजकारण केले नाही आणि करणारही नाही. कर्मकांडात विश्वास ठेवणार्यांनी बहुजनांना शेकडो वर्षा पासून कायम गुलाम करून ठेवले आहे अश्या मनुवाद्यांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. त्याचप्रमाणे पक्षात कवडीचीही किंमत नसणाऱ्या आणि भविष्यातील सत्ता घराण्यातच राहिली पाहिजे अश्या कुत्सित आणि सरंजाम विचारांच्या अनुप धोत्रे सारख्या ऐतखाऊ आणि कर्तृत्व शून्य व्यक्तीने गलिच्छ राजकारणा बद्दल बोलूच नये, कारण गलिच्छ राजकारण आणि राजकारणाची सुरुवात त्यांच्याच घरातून सुरू झाली आहे. अकोला जिल्हाला निष्क्रियतेच्या पर्वातून सुज्ञ मतदार लवकरच मुक्त करतील…डॉ धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र.