अकोला – अमोल साबळे
ग्रेटर मुंबई महानगर पालिका सहायक आयुक्त अजित कुंभार यांची अकोला जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांची मुंबई येथे माहिती तंत्रज्ञान संचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण ४१ आयएएस अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये २०१४ च्या बॅचच्या अधिकारी आणि जवळपास अडीच वर्षांपासून अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत नीमा अरोरा यांच्या जागेवर महाराष्ट्र केडर २०१५ बॅचचे आयएएस अधिकारी अजित कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ग्रेटर मुंबई येथील महानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त म्हणून कुंभार कार्यरत होते.”