अकोला – मागील पंचवीस वर्षानुसार यावर्षीही श्रावण महिण्याच्या शेवटच्या सोमवारी कावड़ पालखी उत्सवानिमित्त शिवभक्तांना प्रसाद वितरणाचा कार्यक्रम माजी महापौर व प्रदेश कांग्रेसचे सचिव मदन भरगड यांनी स्थानिक सिटी कोतवाली चौकात आयोजित केला होता.
प्रत्येक कावड पालखीची पूजा करुन कावड पालखी सोबत आलेल्या हजारों शिवभक्तांना प्रसाद वितरण करुन हे सेवाभावी कार्य करण्यात आले.
पालखी कावड़च्या या उत्सवामधे अकोला शहरातील व जिल्हयातिल जवळपास दोनशेच्या वर पालखी व कावड़ घेऊन शिवभक्त सामिल होतात. अकोला येथून १६ किलोमीटर दूर असलेल्या वाघोली येथून पूर्णा नदीचे जल आणून श्री राजराजेश्वराचे जलाभिषेक करतात. ही परम्परा मागील ८० वर्षा पासून अविरत सुरु आहे.अकोला शहराचा हा पालखी कावड़ उत्सव सर्वधर्म समभावतेचा प्रतीक आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मदन भरगड, राजेन्द्र चितलांगे, गणेश कटारे,अभिषेक भरगड, राजेश पाटिल ,मनीष नारायणे, सूरज भरगड,प्रदीप खंडेलवाल, राजेश भंसाली,देवीदास सोनवणे,मयूर जोशी, अजय रावनकर,राजू साहू,सुनील साठे, पवन खंडेलवाल, धर्मेन्द्र चितलांगे,कुंदन गुप्ता, यांनी अथक परिश्रम घेतले.