अकोला जिल्ह्यात भारिप बहुजन व सध्याची वंचित बहुजन आघाडीचा दबदबा असताना वंचित सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणारे हरीदास भदे यांनी आज मुंबईत मातोश्री वर महाराष्ट्रातील त्यांच्या असंख्य चाहत्यासोबत पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने अकोल्यात शिवेसना काही प्रमाणात मजबूत झाल्याचे दिसते.
हरिदास भदे हे अकोला पूर्वचे दोन वेळा आमदार होते, त्यांनी दोन वर्षा अगोदर वंचित बहुजन आघाडी सोबत फारकत घेवून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात गेले होते. गेल्या काही दिवसांपासून हरिदास भदे हे शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती. येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत त्यांना पुन्हा उभा राहायचं? मात्र राष्ट्रवादीत झालेल्या पक्षफुटीमुळे त्यांनी इतर कुठल्या पक्षात न जाता थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत आज मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.
हरिभाऊजी भदे यांचा प्रवेशावेळी त्यांच्या असंख्य कार्यकर्ते घेवून पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवेश केला. या प्रसंगी शिवसेना नेते खा. अरविंद सावंत साहेब, जिल्हा प्रमुख आ. नितीन बाप्पू देशमुख, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, अप्पू तिडके यांचे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.