अकोला – संतोषकुमार गवई
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील निर्देशांकावर आधारित राज्यस्तरावर गुणानुक्रम ठरविण्यात येतो. त्यानुसार काही महत्त्वाचे आरोग्य निर्देशकांचे संपूर्ण राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कामाचे राष्ट्रीय कार्यक्रम जसे कुटुंब कल्याण कार्यक्रम, लसीकरण ,माता बाल संगोपन, बाल आरोग्य ,माता आरोग्य आर सी एच पोर्टल ,आयडीएसपी ,एन एल इ पी ,कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, एन. सी. डी. इत्यादी महत्त्वाचे निर्देशांकाचे गुणाक्रम नुकतेच राज्यस्तरावरून काढण्यात आलेले आहे.
यामध्ये आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला ने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. माहे डिसेंबर 2023 अखेर या गुणानुक्रमात अकोला जिल्हा पहिल्या पाच क्रमांकात हि नव्हता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला बी वैष्णवी व डॉक्टर कमलेश भंडारी उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ अकोला यांचे मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे यांनी नियमित आढावा, पाठपुरावा, प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन मार्गदर्शन करणे,
तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र चे कामात सुधारणा करण्याकरिता जिल्हास्तरीय पर्यवेक्षक तसेच तालुक्याच्या कामात चे सनियंत्रण करणे करिता तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हास्तरीय अधिकारी यांचे वर जबाबदारी सोपविण्यात आली प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावरील आरोग्य सेवक सेविका अशा स्वयंसेविका यांचे कामात सुधारणा करून जिल्ह्याला राज्यातून प्रथम क्रमांकावर पहिल्यांदाच पोहोचण्यात यश मिळाले याकरिता डॉक्टर बळीराम गाढवे,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत पवार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद करंजेकर माता बाल संगोपन अधिकारी जिल्हास्तरीय अधिकारी जिल्हास्तरीय पर्वेक्षक तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी सर्व आरोग्य कर्मचारी अशा स्वयंसेविका यांनी केलेल्या अथक परिश्रमाचे कौतुक माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी मॅडम आणि डॉक्टर कमलेश भंडारी उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ अकोला यांनी केले आहे.