अकोला, दि. 6 : महिला व बाल विकास विभाग, बालकल्याण समिती व शुभोदय फौंडेशनतर्फे शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बालगृह येथे मुलांसाठी उन्हाळी दहा दिवसीय शिबिराचा शुभारंभ शनिवारी (4 मे) झाला. शुभारंभाच्या दिवशी विद्यार्थ्यांना योगशास्त्राची माहिती व प्रात्यक्षिकाद्वारे योगासने शिकविण्यात आली.
राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲड. संजय सेंगर, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड.अनिता गुरव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, समितीचे सदस्य राजेश देशमुख, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी राजू लाडुरकर, संरक्षण अधिकारी सुनील लाडूरकर, शुभोदय फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिरभाते आदी उपस्थित होते.
श्री. पुसदकर, श्रीमती गुरव मॅडम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुलांना योगाचे महत्त्व समजून सांगण्यात आले. मुलांनी उत्साहाने योग प्रात्यक्षिकांत सहभाग घेतला. हर्षाली गजभिये यांनी समन्वय साधला. जयश्री वाडे यांनी आभार मानले. शुभोदय फाउंडेशन, सिटी चाईल्डलाईन विद्या उंबरकर,शरयू तळेगावकर,राजेश मनवर,रोहित भाकरे,वैभव भदे, अरुणा अंभोरे, तसेच रेल्वे चाईल्ड लाईनचे पद्माकर सदांशिव , अपर्णा सहारे यांनी सहकार्य केले.
०००