Akola : अकोला जिल्हाच्या मतदार यादीत युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि या मतदार संघाचा खासदार निवडण्यात त्यांची मोठी मोलाची भूमिका यावेळी असणार आहे. मात्र युवकांच्या मनात कोणात उमेदवार आहे आणि यावेळी कोणाल निवडून देतील हे सध्या सांगता येणार नाही. मात्र यावेळी मोठ्या प्रमाणत युवक मतदान करतील अशी आशा आहे. जिल्ह्यात बेकारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यात अकोला जिल्ह्यात अकोला, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, अकोट आणि तेल्हारा हे 7 तालुके असून या ७ ही तालुक्यात मोठा उद्योग नसून या जिल्ह्यातील तरुण तरुणी नोकरीसाठी पुणे, मुबई, यासारख्या मोठ्या शहराकडे धाव घेतात. कारण जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ (एमआयडीसी) नावालाच आहे. मोठ्या कंपन्या नसल्याने येथील तरुणांना पुणे, मुंबई व इतर मोठ्या शहरात जावून नोकरी करावी लागत आहे. वेतनाचे दर सुद्धा कमी आहेत. कायम रोजगाराची शाश्वती नाही व श्रमिकांना कमी वेतनावर काम करावे लागत आहे.
निवडणुका लागल्या की प्रचाराच्या वेळेस उमेदवार मोठे मोठे आश्वासन देवून मतदार संघातील बेकारी कायमची मिटवण्याची शपथ घेतात एकदा निवडून आल्यावर सर्व विसरून जातात. भरकटलेले युवक त्याच्या बळी पडतात मग पुढे जाऊन त्यांचे कार्यकर्ते होतात. जिल्ह्यातील दरवर्षी हजारो युवक युवती नोकरीसाठी अर्ज करतात व बिगर नोंदणीकृत बेरोजगारांची संख्या लाखावर आहे. परीक्षा फीसाठी तडजोड करून हजार रुपये फी भरून सुद्धा पेपर रद्द केला जातो हे गेल्या दोन वर्षातील राज्यातील वास्तव आहे. आणि राज्यात महायुतीचे सरकार असून युवकांना नोकरी देण्यासाठी अपयशी ठरले आहे. तर युवकांना त्याचा प्रश्न मार्गी लावणारा नेता त्यांना हवा आहे. जो जिल्ह्यात मोठा रोजगार उपलब्ध करू शकणार.
गेल्या दोन वर्षापासून राज्यात होत असलेल्या नोकरी भरतीच्या परीक्षा आधीच पेपरफुटीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याला कोण जबाबदार आहेत हे जनतेला चांगले ठाऊक आहे मात्र सत्तेपुढे शहाणपणा चालत नसल्याने तरुण शांत बसतात. गेल्या दोन तीन वर्षात जिल्ह्यातील किती तरुण तरुणी नोकरीला लागले? आता परिस्थिती अशी आहे की मुलाने घरी आई वडिलांना परीक्षेकरिता फी मागितली तरी घरची मंडळी देत नाही.
दुसरीकडे व्यावसायिक शिक्षण पूर्ण करूनही नोकरीसाठी वणवण करणाऱ्या तरुणांची संख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. रोजगार मेळाव्यात हजारो तरुण हजेरी लावत असल्याने जिल्ह्यात बेरोजगारीचा ‘पूर’ आल्याचे स्पष्ट होत आहे. नोकरी मिळावी यासाठी बेरोजगार शासकीय कार्यालयातील रिक्त जागांसाठी अर्ज करत आहेत. परंतु जागा कमी व अर्जदारांची संख्या अधिक असल्यामुळे निवडक तरुणांनाच रोजगाराचे साधन उपलब्ध होत आहे.
म्हणून या लोकसभा निवडणुकीत युवक असाच उमेदवार निवडून देतील जो उच्च शिक्षित असेल ज्याला पक्षाने मिरीट मध्ये तिकीट देवून उभ केल. सोबतच युवकाच्या रोजगाराची जाणीव आहे. ज्याने युवकांसाठी अनेक रोजगार मेळावे आयोजित केले असून बर्याच युवकांना रोजगाराची संधी दिली अश्याच उमेद्वारच्या पाठीशी अकोल्यातील तरुण असणार आहे असे अनेक युवकांच्या बोलण्यातून समजते.