Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीअकोला | शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सावकाराच्या पाठीशी कोणता आमदार?...

अकोला | शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सावकाराच्या पाठीशी कोणता आमदार?…

अकोला : जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी घटना समोर आलीय, जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात सावकारीत पचवलेल्या शेतीचा ताबा सोडण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याच्या प्रयत्न झाला होता. मात्र या प्रकरणाला तब्बल १० दिवस उलटूनही सावकारावर कोणतेही मोठी कारवाई झाली नाही, या सावकाराच्या पाठीमागे मोठी राजकीय शक्ती असल्याचे जनसामान्यात चर्चा होती. मात्र हे प्रकरण विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी x वर व्हिडीओ सहित पोस्ट केल्याने आज पहिली कारवाई झाली. सावकार मनोहर शेळकेच्या तेल्हारा तालूक्यातील भांबेरी गावातल्या घरावर सहकार विभागाचे छापे टाकले आहेत. सहकार विभागाने येथून जवळपास 38 कागदपत्र जप्त केलेत. आज सकाळी सहा वाजता या ठिकाणी सहकार विभागांना छापेमारी केली. दुपारी तब्बल दोन वाजेपर्यंत शेळके यांच्या निवासनावर सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू होती.

प्रकरण काय आहे?…

मनब्दा गावातील हरिभाऊ गतमणे या शेतकऱ्याची चार एकर शेती सावकाराने पचवल्याचा आरोप त्यांनी केला होता. पैसे परत केल्यानंतरही शेतीचा शेळके आणि भोजने यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी शेतकरी गतमणे यांचा मुलगा संदीपला 17 मे रोजी शेतातच चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न झाला होता. तर वृद्ध शेतकरी हरिभाऊ गतमणेंवर प्राणघातक हल्ला देखील चढविला होता. याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या प्रकरणी सावकार मनोहर शेळकेच्या दोन मुलांसह चौघांवर गुन्हे झाले होते. सावकार शेळके यांच्यावर १० दिवसात कोणतेही कारवाई झाली नसल्याने शेळके यांचे एका भाजपच्या आमदाराशी जवळचे संबंध असल्याने कोणतेही कारवाई झाली नसल्याची चर्चा होती. मात्र हा आमदार नेमका जिल्ह्यातील कोणत्या मतदार संघातील आहे हे जरी स्पष्ट नसले तरी काही स्थानिक पत्रकारांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा अनेकजण आरोप करीत आहे.

हे प्रकरण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर आपली प्रतिक्रिया दिली होती की सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न हा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा आणि मनाचा थरकाप उडवणारा प्रसंग आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या मनब्दा या गावी एका अवैध सावकाराच्या गुंडाने शेतकऱ्यावर प्राणघात हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच हे गुंड थांबले नसून संबंधित शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेताचा ताबा घेण्याचासुद्धा प्रयत्न केला. शेतकरी आणि त्याच्या परिवाराने विरोध केला असता त्यांना ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न या गावगुंडातर्फे करण्यात आला. संबंधित शेतकऱ्याच्या म्हाताऱ्या वडीलाला व पत्नीलासुद्धा मारहाण करण्यात आली. महायुती सरकारच्या काळात अवैध सावकारीने पुन्हा डोके वर काढले असून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न अवैध सावकारांकडून होत आहे. शेतकऱ्यांचा सूड घेणाऱ्या अवैध सावकारांवर सरकारने कडक कारवाई करावी. अशी मागणी त्यांनी केली होती.

आज तपासणी दरम्यान जिल्हा उपनिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 6 खरेदी कागदपत्रे आणि झेरॉक्स प्रती 3, बॅक पासबुक एकत्रित 17, चेक बूक 2, खुले धनादेश 2, सोबतच दोन ईसार पावत्या, कोरी स्टॅम्प1 याशिवाय इतर काही प्रॉपर्टी 5 कागदपत्रे असे एक एकत्रित 38 कागदपत्र शेळके यांच्या निवासस्थावरुन जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधकारी प्रवीण लोखंडे यांनी दिली.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: