अकोला जिल्ह्यात एका आगळ्या वेगळ्यालग्नाची चर्चा फार होत आहे ते म्हणजे शंकर-पार्वतीचा अनोखा विवाह सोहळा हे लग्नही इतर लग्नासारखच आहे…मात्र काहीसं जरा हटके…लग्नात वाजंत्री, पाहुणे, जेवणावळी, मानपान असं सर्व काही आहे…पण या लग्नाला नवरी आणि नवरदेव प्रत्यक्ष हजर नाही…त्यांच्या मूर्ती समोरासमोर ठेवून हे लग्न लावण्यात आलंय.. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करणाऱ्या या लग्नाचं उत्तर शोधण्यासाठी चला आपणही जाऊयात अकोला जिल्ह्यातील या लग्नाला…
लग्नपत्रिका…वाजंत्री, तुतारी, सनई चौघडे…
वऱ्हाडी मंडळींची लगबग…नवऱ्या मुलाच्या मित्रांचा लग्नाच्या मिरवणुकीत नाचण्याचा जोश…कोणत्याही लग्नातील असंच काहीसं चित्र आणि नजारा असतोय…याही लग्नात सर्व काही असंच होतंय…पण तरीही हे लग्न अतिशय “स्पेशल” होतंय…
हे लग्न होतंय देवाधीदेव महादेव अन पार्वतीचं… शंकर-पार्वती विवाह सोहळ्याची ही परंपरा अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यातल्या रेल या गावानं गेल्या ६०० ते ७०० वर्षांपासून जोपासली आहेय..गावातील महादेव कोळी हा आदिवासी समाजानं ही परंपरा अजूनही जोपासलीये..चैत्र महिन्यातील चैत्र शुद्ध या मुहूर्ताच्या दिवशी या गावात शंकर पार्वतीचा विवाह सोहळा साजरा केला जातोय..अध्यक्ष श्री सुधाकरराव घुगरे
चैत्र महिन्यातील चैत्र शुद्ध या मुहूर्ताच्या दिवशी या गावात शंकर पार्वतीचा विवाह सोहळा साजरा केला जातोय…तोही अगदी खऱ्या-खुऱ्या लग्नासारखाच…
दरवर्षी गावातील दोन नवीन कुटुंबांना नवरा आणि नवरी मुलीच्या आई- वडिलांचा मान दिला जातोय..लग्नाच्या दिवशी मुलाकडच्या वऱ्हाडी मंडळींची सरबराई करण्यात गावातील प्रत्येकजण गुंतलेला असतोय… गावातील घुगरे कुटूंबियांकडे वरपक्षाचा तर इंगळे परिवाराकडे वधुपक्षाचा मान परंपरेने आहेय..बर हे सर्व सुरू असतांना आम्ही ज्यापासून तुम्हाला दूर घेऊन जाणार होतो आणि झालं उलटच , शेवटी राजकारण आलच..
अकोला लोकसभेचे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांची धर्मपत्नी यांनी ही या लग्नात उपस्थिती लावली..महादेवाचं लग्न आणि मतदारांची उपस्थिती मग नेते मंडळी कशी का ही संधी सोडणार…भाजप उमेदवाराने विकासात्मक कामांना अधिक गती मिळावी असे देवाला साकळे घातले..
हा विवाह सोहळा प्रतीकात्मक असला तरी यामागे लपलेल्या या गावकऱ्यांच्या भावना मात्र तेव्हढ्याच खऱ्या आहेत.