अकोला जिल्ह्यातील ग्राम उगवा गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका ४० वर्षीय महिलेनं २४ वर्षीय प्रियकराच्या मदतीने आपल्या पन्नास वर्षीय पतीला संपवलं. अकोला पोलिसांनी या प्रकरणाचा चार दिवसात छडा लावलाय. या घटनेतील प्रियकरासह महिलेला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं.
काय आहे नेमकं प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तारीख १२ ऑक्टोंबर अकोल्यातील अकोट फ़ैल पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम उगवा शेतशिवारात गवतात सुमारे ५० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह कुंजलेल्या अवस्थेत असल्यानं मृतदेहाची ओळखं पटत नव्हती. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णाल्यात पाठवण्यात आला, आणि वैद्यकीय अहवालात धक्कादायक बाब समोर आली. मृताच्या डोक्यावर, छातीवर मारहाण केल्याच्या जखमा होत्या. पोलिसांनी ‘त्या’ दिशेने तपास सुरू केला, परंतु अकोला पोलिसांसमोर मृतदेहाचं ओळख पटवण्याचं एक मोठं आव्हान होतंय.
अशी झाली ओळख
अकोट फैल पोलिसांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सर्व बेपत्ता प्रकरणाची तपासणी सुरू केली, तपासा दरम्यान सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एक मिसिंग दाखल होती. त्यामध्ये पन्नास वर्षीय व्यक्तीच्या अंगावर जांभळे शर्ट, कंबरला पट्टा बांधलेल्या अवस्थेत बेपत्ता असल्याचं नमूद होतं. त्यात मृतदेहाजवळ देखील हेचं साहित्य मिळून आलेलं होतं. नातेवाईकांना ठाण्यात बोलावनं दिलं असून ओळख निष्पन्न झाली असून विद्यावानं बरीळाम प्रधान (वय ५० राहणार कृषी नगर.) असं मृत व्यक्तीचं नाव असल्याचे समजल.
माहितीप्रमाणे विद्यावानं प्रधान आणि कुंकूला (वय ४०) या दोघा पती-पत्नींना एक मूल होतं. मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येला तिने आपल्या पतीला जबाबदार धरलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये सातत्यानं वाद व्हायचे. आणि दोघेही वेगळे-वेगळे राहु लागले. पत्नी शिवणी तर पति कृषी नगरात. पत्नी कुंकूला हे हॉटेलमध्ये काम करायची तर पति विद्यावान याला दारुच व्यसन असल्याने तो रिकामाच होता. तिने मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पतीला संपवण्याचा कट तिने सुरू केला. आपण एकट काही करू शकणार नाहीये, यासाठी कोणाला तरी हाताशी घेऊ, असं ठरवलं. ज्या ठिकाणी कुंकूला काम करायची, तिथूनच जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये लकी श्रवणजी तेलंते (वय २४ वर्ष रा. मोठी उमरी, अकोला) हा तरुण काम करायचा. त्यानंतर दोघांमध्ये हळूहळू संवाद वाढू लागला, दोघे बाहेर भेटू लागले, मैत्रीही घट्ट झाली. आणि या मैत्रिणीचे रूपांतर कालांतराने प्रेमात झालं.
बघता बघता लकी कुंकूलाच्या प्रेमाच्या प्रचंड आहारी गेला, दोघे एकमेकांसमोर व्यथा मांडू लागले. काही दिवस उलटले आणि तिने आपल्या मनात साठवून ठेवलेलं दुःख त्याच्यासमोर मांडलं. दुःख ऐकल्यानंतर लकीना तिला भर दिलाय. त्यानंतर इथून पुढे विद्यावानच्या हत्येचा कट सुरू झाला. तिच्या पतीची संपूर्ण माहिती लकीनं गोळा करून घेतली आणि कामाला लागलाय.विद्यावानला दारूचे प्रचंड व्यसन होतं, तो नेहमी मुर्तीजापुर रोडवरील बिग सिनेमागृहांसमोर बसायचा. हळूहळू लकीनंही आपला मार्ग इथे वळवला. तोही रोज इथे येऊ लागला, लकी आणि विद्यावानची ओळख झाली, दोघेही सोबत दारु पिऊ लागले. लकीनं त्याचा खर्चही उचलला, अनेकदा टॉकीजमध्ये जाऊन सिनेमा दाखवू लागला. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. अखेर विद्यवानच्या हत्येची तारीख ठरली.
दारु पाजली अन् काढला काटा
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील माहिन्यातील २४ सप्टेंबर रोजी दोघेही दारू सोबत घेऊन लक्झरी बसनं ग्राम उगवा येथे गेले. इथल्या एका शेतात दोघे दारू प्यायला बसले. रात्री उशिरापर्यंत लकीनं मनसोक्त दारू पाजून विद्यावान डोक्यावर हातातील लोखंडी कळयानं वार केले. छातीवरी ४० ते ५० वेळा बुक्क्या मारल्या. त्याच्या गुप्तांवरही लोखंडी कळयानं मार केला. यामध्ये जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला अन् लकीनं घटनास्थळावरून पळ काढला. परंतु सुमारे १८ दिवसानंतर विद्यावानचा मृतदेह समोर आला आणि संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान लकीनं या संपूर्ण घटनेचा खुलासा केला आणि त्याच्याच पत्नीच्या म्हटलंप्रमाणे आपण एक कृत्य केल्याचं त्यांनं कबुली दिली. सद्यस्थितीत कुंकूला आणि लकी दोघे पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेचा संपूर्ण खुलासा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जगदीश जायभाय, जितेंद्र काटखेडे, संतोष चिंचोळकर, इंगळे असलम शहा यांनी केली आहे.