अकोला शहरातील जठारपेठ चौकात उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना उपप्रमुख पदावर कार्यरत असलेल्या विशाल रमेश कपले यांच्यावर चाकूहल्ला करून त्यांना गंभीर जखमी क्ले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ जवळच असलेल्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रामदास पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हल्ला कोणी व का केला याचा शोध घेत आहेत.
उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना उपप्रमुख पदावर कार्यरत असलेल्या विशाल रमेश कपले अंदाजे वय 33 वर्षे रा. उमरी अकोला यांच्यावर अत्यंत गजबजलेल्या व वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या प्राणघातक हल्ल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की कोणत्या कारणाने झाला याबाबत तर्कवितर्क लढवले जात असून रामदास पेठ पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यास सुरुवात केली आहे. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला असून आरोपींना शोधण्यासाठी पोलीस रवाना झाले आहेत.