Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअकोला | रेल्वे खाली आल्याने दोघांचा मृत्यू...एकाची ओळख पटली तर दुसऱ्याची...

अकोला | रेल्वे खाली आल्याने दोघांचा मृत्यू…एकाची ओळख पटली तर दुसऱ्याची…

अकोला | शहरातील दोन इसमाचा रेल्वे खाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडीस आली असून एक घटना काल रात्रीच्या दरम्यान तर एक घटना आज सकाळच्या दरम्यान घडली यातील एका मृतकाची ओळख पटली असून दुसर्याची ओळख पटविण्यासाठी अकोला GRP करीत आहे.

काल रात्री आठ वाजताच्या दरम्यान अकोला रेल्वे स्थानका जवळ असलेल्या माल धक्का येथे 40 वर्षीय इसम रेल्वे खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला अशी माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाणू अधिक तपास केला असता सदर 40 वर्षीय इसम हा शहरातील अकोट फाईल, भारत नगर येथील रहिवासी अब्दुल अशपाक अब्दुल फारुख याचा असल्याचे निष्पन्न झाले.

तर दुसरी घटना आज सकाळच्या सुमारस पिकेव्ही जवळील उड्डाणं पुला खाली असलेल्या रेल्वे रुळावर घडली सकाळी 8 वाजताच्या दरम्यान धावत्या रेल्वे मधून एक युवक खाली पडला असल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळतच एम आय डी सी पोलिसांनी घटनास्थळ गाठले असून अध्याप पर्यंत सदर इसमाची ओळख पटली नसल्याने पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सेवाविच्छेदनासाठी अकोला स्वरूपच्या रुग्णालय येथे पाठविण्यातत आला असून अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: