Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीअकोला | तृतीयपंथीयांचा कौलखेड चौक परिसरात हैदोस...चिमुकलीसह गर्भवती महिलेलाही केली मारहाण...

अकोला | तृतीयपंथीयांचा कौलखेड चौक परिसरात हैदोस…चिमुकलीसह गर्भवती महिलेलाही केली मारहाण…

अकोला – आजकाल नकली तृतीयपंथीयांचा बाजारात मोठा वावर वाढला. जबरदस्तीने लोकांकडून पैसे वसूल करणे हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. काल अकोला शहरातील कौलखेड चौक परिसरात असलेल्या मंगेश टेलर्सच्या संचालकासह त्यांच्या मुलाला ५०० रुपयांची मागणी केल्यानंतर २०० रुपये दिले म्हणूण तृतीयपंथीयांनी बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री उशीरा घडली. त्यानंतर या ठिकाणी उभ्या असलेल्या पाच वर्षीय चिमुकलीस मारहाण करीत गर्भवती महिलेलाही लोटपाट केल्यानंतर दुकानातील साहित्य बाहेर फेकून दिले.

कौलखेड चौक परिसरात पेंढारकर मूर्तिकार यांच्या बाजूला मंगेश टेलर्स कापड शिवण्याचे काम करतात. गुरुवारी रात्री ते दुकानामध्ये त्यांच्या मुलासोबत कापड शिवण्याचे काम करीत असताना यावेळी पाच ते सहा तृतीयपंथी त्यांच्या दुकानामध्ये आले. त्यांनी पाचशे रुपयांची मागणी केली. मात्र त्यांच्याकडे पाचशे रुपये नसल्याने त्यांनी २०० रुपये देतो म्हणून सांगितलै. यावरुन तृतीयपंथीयांना संताप अनावर झाल्याने त्यांनी पुन्हा पाचशे रुपयांची मागणी करीत राडा सुरु केला.

काही वेळातच मंगेश टेलर्स व त्यांच्या मुलास जबर मारहाण करून पैसे हिसकाण्याचा प्रयत्न केला. मात्र गल्ल्यात पैसे नसल्याने तृतीयपंथीयांनी हैदोस घालीत दुकानातील साहित्य फेकफाक केले. या घटनेची माहिती मीळताच माजी नगरसेवक पंकज गावंडे मीत्रांनी धाव घेतली. त्यांनी घटनेची माहिती खदान पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दाखल होताच तृतीयपंथी फरार झाले. त्या तृतीयपंथीयाचा शोध सुरु केला. हे तृतीयपंथी बनावट असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: