Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीअकोला | चोरट्यांनी SBI बँकेचे ATM फोडले...१६ लाखांपेक्षा जास्त रक्कम केली लंपास...

अकोला | चोरट्यांनी SBI बँकेचे ATM फोडले…१६ लाखांपेक्षा जास्त रक्कम केली लंपास…

अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या केशव नगर स्थित रिंग रोड मुख्य रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएमवर मध्यरात्री फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. असून या ATM मधून 16 लाख 54 हजारची रक्कम चोरी गेली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या प्रकरणी खदान पोलीस अधिक तपास करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीचे सत्र सुरु असून सर्वात ज्यास्त चोरीचे प्रमाण खदान परिसरात घडत आहेत. घरफोडी, दुचाकी चोरी, मोबाईल चोरी ही तर नित्याची बाब बनली असून आता तर चक्क चोरट्यांनी ATM वर लक्ष केंद्रित केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. थंडीची चाहूल त्यात पोलीस भरती असल्याने पोलीस कामात व्यस्त असल्याने मध्य रात्रीच्या सुमारस केशव स्थित रिंग रोड वरील SBI बँकेचे ATM अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आली.

गॅस कटरच्या सहाय्याने हे ATM फोडल्याचा अंदाज वर्तविण्यात असून ATM मधून 16 लाख 54 हजारची रक्कम या चोरट्यांनी उडवली घटनेची माहिती मिळताच अकोला पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, खादान पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून आसपास च्या परिसरातील सीसी टीव्ही फुटेज तपासण्याचे काम जोरात सुरु आहे.

तर एकट्या खदान पोलीस स्टेशन च्या हद्दीत गेल्या महिन्याभरात चोऱ्या करून चोरट्यानी खदान पोलिसांसमोर आव्हान उभे केले तर आज मुख्य रस्त्या लगत असलेले हे ATM फोडून चोरट्यांच्या टोळ्या सक्रीय झाल्याचे या घटनांवरुन दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: