Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअकोला | कुख्यात गुन्हेगाराच्या हत्येन शहर हादरलं...

अकोला | कुख्यात गुन्हेगाराच्या हत्येन शहर हादरलं…

अकोला शहरातील आंबेडकर नगरमधील रहिवासी असलेला कुख्यात गुंडाची काल रविवार १२ जूनच्या मध्यरात्रीनंतर तीक्ष्ण शस्त्राने निघृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आल्याने अकोला शहर हादरलं आहे. अनिल लद्दाड असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव असून त्याची अनेक गुन्ह्यात सहभागी असून त्यावर विविध गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अकोला रेल्वे स्थानक परिसरातील गेट क्रमांक २ समोर काल रात्री १.३० वाजताच्या सुमारास सराईत गुन्हेगार अनिल लद्दाड याच्यावर धारधार शस्त्राने वार करुन गंभीररित्या जखमी करुन हल्लेखोर पसार झाले.अनपेक्षित घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. रात्रीच्या प्रवासासाठी आलेल्या प्रवाशांची धावपळ उडाली. परिसरात हजर असलेल्यांनी घाबरून जाऊन प्लॅटफार्म गाठले. दरम्यान पोलिसांना तातडीने या घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रामदास पेठ पोलिस आणि वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोचले. तेव्हा लद्दड गंभीर अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.पोलिसांनी तातडीने उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. पण तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनास्थळ पंचनामा करून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयावरून रात्रीच एकाला ताब्यात घेतले.तर या हत्याकांडात एकुण चौघांचा सहभाग असल्याचे स्पष्ट होते आहे. रेल्वे स्टेशन सारख्या गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेमुळे स्टेशनवरील पोलिसांचा भुमिकेवर प्रश्न निर्माण झाला आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: