प्रतिनिधी अकोला – अमोल साबळे
ग्रामीण भागातील शिलाताईनी पतीला किडनी दान करून एक महिलान मधे हिम्मतीचा वसा जपला आहे
बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथील वसंतराव समाधान साबळे म्हटले की एल.आय.सी त्यांनी ऊन-वारा पावसात खेडोपाड्यांनी जीवन विमा पॉलिसी काढण्यासाठी दुचाकीने फिरत – फिरता अनेक एल.आय.सी काढल्या एवढ्या काढल्या की अकोला जिल्ह्यात वसंतराव हे एलआयसी मध्ये प्रथम क्रमांकावर येऊन त्यांना गोल्ड मेडलिस्ट पुरस्काराचे मान्य करी ठरले असून त्यांना अनेक पुरस्कार अनेक पारितोषिक एलआयसी मार्फत मिळाली. असे असताना अकोला जिल्हातच नव्हे तर संपूर्ण अमरावती विभागात आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे व श्रमामुळे व मेहनत मुळे त्यांनी जीवन विमा पॉलिसी मध्ये आजही सुद्धा नाव लौकिक केले आहे.
एल. आय. सी चे काम सुरू असताना यातच वसंतराव यांना काही दिवसांपासून त्रास होत असल्यामुळे औरंगाबाद येथील युनायटेड सिम्मा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी असल्याचे सांगितले. त्यामुळे संपूर्ण साबळे परिवारावर व संपूर्ण परिसरात आघात कोसळला. आता काय करायचे असा प्रश्न त्यांच्या समोर पडला. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. त्यांची पत्नी शिलाताई वसंता व वसंता यांचा किडनी रक्तगट मॅच झाल्याने किडनी प्रत्यारोपण करण्याचा मार्ग मोकळा झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव
लोकांच्या मनात किडनी देणान्याबद्दल गैरसमज आहे. तो दूर झाला पाहिजे. वैद्यकीय शास्त्रात खूप प्रगती झाली आहे. या शस्त्रक्रियेमध्ये किडनी देणारा आणि घेणारा दोघेही आनंदात जगू शकतात.
असे या रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उन्मेश टाकळकर, किडनी विकार तज्ञ डॉ सचिन सोनी, श्रीगणेश बरणेला, मूत्र विकार तज्ञ डॉक्टर अरुण चिंचोळे, अभय महाजन यांनी सांगितले.
वाढल्याने मागील काही महिने किडनी प्रत्यारोपण थांबले होते. आता परवानगी मिळाल्याने ही शस्त्रक्रिया डॉक्टरांनी बुनाइटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये केली. पत्ती, पत्नी दोघांचीही प्रकृती उत्तम आहे
ज्यांच्याशी आयुष्याची गाठ बांधली, त्यांची मरणयातना दिसत होती. त्यांच्याशिवाय माझे जीवन अधुरे राहिले असते. त्यामुळे मी मनात कोणताही संकोच न ठेवता, किडनी देण्याची मनात खूणगाठ बांधली होती. आता आम्ही दोघेही सुरक्षित आहोत.
शीलाताई वसंतराव साबळे (वय ५०) किडनी दात्या पत्नी
माझ्या पत्नीचे जेवढे मानावेत तेवढे उपकार कमीच आहेत. तिच्यामुळेच मी पुढील आयुष्य सुखासमाधानाने जगणार आहे. त्यामुळे डॉक्टर व माझी अर्धांगीनी पत्नीचा मी सदैव कृतज्ञ राहील.
वसंतराव समाधान साबळे (वय५४)