अकोला : मुंबईत अकोल्याच्या एका तरुणीची राहत असलेल्या वसतीगृहातील सुरक्षा रक्षाकानं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून तिची हत्या केली होती, हि घटना ताजी असतानाच आता अकोला जिल्ह्यातून खळबळजनक घटना समोर आलीय. महिलेने केलेल्या हिमतीमुळे हे प्रकरण समोर आलय. चौकीदाराच्या सतत छळाला कंटाळून महिलेने शहरातील सिव्हिल लाइन पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, एका ३४ वर्षीय विधवा महिला ज्या ठिकाणी काम करीत असायची, तेथील चौकीदार असलेल्या २४ वर्षीय तुरुणानं तिचे काही अश्लील फोटो काढून ‘ते’ व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्याकडून सोन्याचे दागिने उकळले. नंतरही तिच्याकड़ं पैशांचा तगादा लावला. इतकंच नव्हे तर त्यानं बळजबरीनं तब्बल दीड वर्षापासून लैंगिक शोषण केले. त्यानंतरही तिला धमकी देत तिचं सातत्यानं लैंगिक शोषण केलंय. त्याच्या छळाला कंटाळून या महिलेनं विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता. कैलास अशोक धाबे, वय २४, रा. कृषिनगर, अकोला असे आरोपी चौकीदाराचे नाव आहे.
३४ महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की २०२० पासून ‘ती’ साडी वर्कचं काम करते. ज्या ठिकाणी ही महिला काम करायची तिथेच कैलास धाबे हा चौकीदार म्हणून काम करीत असायचा. कैलास अन् पीडित महिला हे दोघे एकमेकांना ओळखत होते. एके दिवशी पीडीत महिला कपडे बदलत असताना चौकीदार किलासनं तिचे चोरून काही फोटो, व्हिडीओ काढले, अन् तिला हे दाखवून पैशांची मागणी करू लागला. त्यामुळे घाबरलेल्या महिलेनं कैलास याला सोन्याचे दागिने दिले. त्यानंतर कैलास धाबे हा पैशांची मागणी देखील घालू लागला. तिच्याकडे पैसे नसल्यानं, आरोपी म्हणजे त्यानं बळजबरीनं तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतरसुद्धा तो वारंवार लैंगिक अत्याचार करायचा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कैलासनं या ३४ वर्षीय महिलेवर फोटो दाखवत ब्लॅकमेल करून दीड वर्ष अत्याचार केला. त्यावेळीसुद्धा त्यानं फोटो काढले आणि ते प्रसारित करण्याची धमकी देत होता. अखेर महिलेला कैलासच्या त्रासाला वैतागून गेली. अन् सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठत आपली आपली तक्रार दाखल केली.
पीडित महिलेच्या पतीचं निधन झाले तिला एक मुलगी आहे. कुटुंबीयांचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी तिने साडी वर्कचं काम सुरू केलं. मात्र येथील चौकीदारांनं तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. परंतू आरोपी चौकीदार कैलास धाबे याच्या त्रासाला महिला चांगलीचं वैतागून गेली होती, त्याच्या या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्याचा प्रयत्न देखील केला होता, ९ जूनला राहत्या घरात तिने विषारी औषध प्याल्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होता. अखेर कुटुंबीयांच्या पाठबळामुळे तिने संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. आता सिव्हिल लाइन पोलिसांकडे तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करताहेत.