अकोला –जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील डोंगरगाव येथील तलाठी 53 वर्षीय राजेश शेळके याला १०/०३/२०२३ रोजी ॲन्टी करप्शन ब्युरो अकोला यांनी 4हजार रुपये लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले असून त्याचे विरोधात उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी राजेश महादेव शेळके, तलाठी डोंगरगाव, ता. बाळापुर वय-५३ वर्षे, रा. संजीव नगर, कोठारी वाटीका कं. ६ च्या मागे, अकोला याने २८/०२/२३ चे १४.२० ते १०/०३/२३ चे १४.२० वा. चे दरम्यान १०,०००/- रुपयेलाच मागितली होती त्यापैकी ४००० /- रुपये (ॲडव्हान्सच्या स्वरूपात) ग्राम लोहारा येथील तलाठी कार्यालय, ता. बाळापूर जि. अकोला येथे स्वीकारले.
तलाठी शेळके याने तक्रारदार यांचे डोंगरगाव येथील वडीलोपार्जित शेतजमीनीचे समान हिस्सा वाटणीचे अनुषंगाने तहसिलदार बाळापूर यांना अनुकूल अहवाल पाठविल्याचे मोबदल्यात तसेच फेरफार नोंद करून वेगवगळे ७/१२ देण्याकरीता दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून ॲडव्हान्सचे स्वरूपात चार हजार रूपये स्विकारल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास दिनांक १०/०३/२०२३ रोजी १४.२० वा. ग्राम लोहारा येथील तलाठी कार्यालय, ता. बाळापूर जि. अकोला येथे रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
राजेश महादेव शेळके, रा. संजीव नगर, कोठारी वाटीका कं. ६ च्या मागे, अकोला यांचे विरूध्द पोस्टे. उरळ, ता. बाळापूर जि. अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..ही कारवाई ॲन्टी करप्शन ब्युरो अकोला पोलीस उपअधीक्षक यु. व्ही. नामवाडे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शन मध्ये करण्यात आली.