अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात येत असलेल्या बेलोरा या गावात बनावट देशी दारु बनविणाऱ्या कारखान्यावर अकोला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून नकली देशी दारू व त्याची विक्री केल्या प्रकरणी चौघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पातुर तालुक्यातील बेलोरा या गावात नकली देशी दारू व त्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली असता अकोला विशेष पथकाने छापा टाकला असता ४ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बनावट देशी दारु बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.
यामध्ये, कच्चा माल स्पिरिट, सर्जिकल स्पिरिट, अलकोहोल, फ्लेवर, खाली बोट्ल, झाकने, सीलिंग, लेबलिंग, पेकिंग 2 मशीन व साहित्य, बनावट दारुच्या 8 पेटया जप्त,खाली देशी दारू संत्रा, टैंगो पंच, असा लाख रूपयांचा मुद्देमाल जपत विशेष पथकाची कार्यवाही सुरु आहे…