Sunday, November 17, 2024
Homeगुन्हेगारीअकोला । धक्कादायक...७८ वर्षीय वृद्ध महिलेवर तिघांनी केला अत्याचार…दाळंबी गावाजवळील घटना...

अकोला । धक्कादायक…७८ वर्षीय वृद्ध महिलेवर तिघांनी केला अत्याचार…दाळंबी गावाजवळील घटना…

जिल्हा पोलीस अधीक्षकांचे सखोल तपास करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेला आदेश.

अकोला : मूर्तिजापूर लगतच्या दाळंबी गावाजवळील एक धक्कादायक घटना समोर आलीय. दुचाकीवरून सोडून देण्याचा बहाणा करून एका ७८ वर्षीय वृद्ध महिलेवर पाशवी अत्याचार केल्याची संतापजनक घटना २८ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील बोरगाव मंजू परिसरातील शेतशिवारात घडली. वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी तीन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपी ३० ते ३५ वर्षे वयोगटातील असल्याचा अंदाज आहे.

अकोला बसस्थानकावरून ७८ वर्षीय वृद्ध महिला ही २८ मे रोजी दुपारी एसटी बसने मूर्तिजापूर लगतच्या दाळंबी गावाला जाण्यासाठी निघाली होती. दुपारी सुमारे २ वाजता दाळंबी गावात जाण्यासाठी ही महिला राष्ट्रीय महामार्गावर बसमधून उतरली. तेथून गावच्या रस्त्याने पायी जात असताना त्यावेळी अज्ञात तीन इसम दोन दुचाकीने आले आणि गावात सोडून देतो, असे सांगत तिला वाहनावर बसवले. निर्मनुष्य असलेल्या रस्त्यालगतच्या एका लिंबाच्या शेतशिवारात नेऊन या तिघांपैकी एका युवकाने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी वृद्ध महिलेला देण्यात आली.

यादरम्यान गावातील दोन व्यक्ती रस्त्यावरून जात असताना वृद्ध महिलेला दिसले असता तिने आरडाओरड केली. आवाज कानावर पडताच त्या दोन्ही व्यक्तींनी शेताकडे धाव घेतली. त्यावेळी अत्याचार करणाऱ्या युवकाने घटनास्थळावरून पळ काढला. मदतीसाठी गेलेल्या त्या दोघांनी पीडित महिलेला तिच्या घरी नेले. महिलेने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी बोरगाव मंजू पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली, तसेच याप्रकरणी तक्रार नोंदवली असता, पोलिसांनी अज्ञात तीन जणांविरोधात भादंवि कलम ३७६, ३४ नुसार गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला सखोल तपास करण्याचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने पोलिस पथके गठित करून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: