बाळापूर – सुधीर कांबेकर
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम अभियान राबविण्यात आले असुन त्याअनुषंगाने बाळापुर शहरांत वंचित बहुजन आघाडीचा वतीने जयस्तंभ येथे स्वाक्षरी मोहीम अभियान राबविण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ईव्हीएम विरोधात महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक ३ ते १६ डिसेंबर पर्यंत स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले असुन बाळापुर शहरांत आज वंचित बहुजन आघाडीचा वतीने स्वाक्षरी अभियान जयस्तंभ येथे आयोजीत करण्यात आले.
या स्वाक्षरी अभियान मोहीमला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसुन आले.यावेळी माजी आमदार नातीकोद्दीन खतीब, माजी नगरध्यक्ष ऐन्नोद्दीन खतीब, संजय उमाळे ,गुलाब उमाळे, सिध्दार्थ वानखडे ,इरफान ठेकेदार यांचासह नागरीकांनी स्वाक्षरी अभियान जनआंदोलनमध्ये सामील झाले होते.