अकोला : शहरातील लोकांच्या सुख दुःखात नेहमी धावून जाणारे लोकप्रिय आमदार गोवर्धन शर्मा यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झाले ते गेल्या दोन तीन वर्षा पासुन आजारी असल्याने राजकीय वर्तुळात सक्रिय नव्हते. सच्चा स्वयंसेवक आणि विदर्भवादी नेता हरपला असल्याने अकोलेकरांमध्ये शोककळा पसरली आहे.
अकोला पश्चिमचे भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांचं आज शुक्रवारी (ता. 3) निधन झालं. ते गेल्या दोन तीन वर्षांपासून आजारी असल्याने सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय नव्हते, त्यांची ओळख म्हणजे कोणतेही संपर्काचे साधन नसताना जसे मोबाईल नसतांना लोकांशी असलेला संपर्क दांडगा होता. त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि रामभक्त अशी त्यांची ओळख होती.
अकोला जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. लोकनेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर, प्रमिलाताई टोपले, वसंतराव देशमुख, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचे निकटवर्तीय म्हणून आमदार शर्मा यांची ओळख होती. अकोलेकरांवर कोणतंही संकट ओढवलं तरी धाऊन जाणारे व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. डाबकी मार्गावरील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.(BJP)भाजपसाठी अकोला हा मतदारसंघ कायम अनुकूल मानला जातो.
याच मतदारसंघात गोवर्धन शर्मा ( Govardhan Sharma) यांनी मागील 25 वर्षांत भारतीय जनता पार्टीचा दबदबा निर्माण केला होता. शर्मा यांनी 2014 मधील विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती नसतानाच मोठ्या मताधिक्यासह विजय खेचून आणला होता. अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपची तटबंदी फार मजबूत असल्याचे कायम पाहायला मिळाले आहे.याच मतदारसंघात गोवर्धन शर्मा यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते.