अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे कार्यरत असलेल पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे वय अंदाजे ४३ वर्ष यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास दुचाकीने मुर्तिजापूर कडे जात असताना कुरणखेड येथे भरधाव कारने उडविले. यामध्ये राजेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती होताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेमुळे बोरगाव पोलिसात शोककळा पसरली आहे.
राजेंद्र मोरे हे वाशीम जिल्ह्यातील असल्याची माहिती असून ते काही वर्षापूर्वी बोरगाव पोलीस स्टेशनला उपनिरीक्ष पदावर रुजू झाले होते. ते बोरगावमंजू पोलीस हद्दीतील एका तपास कामासाठी जात असतानाच कुरणखेड जवळ त्यांना एका भरधाव कारणे उडविले यातच उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघात झालेली चारचाकी गाडी पोलिसांच्या ताब्यात. दुचाकीनं जात असताना मोरे यांच्या दुचाकीला कारनं उड़वल्यानं ही दुःखद घटना घडली आहे. मोरे हे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते.