Wednesday, July 24, 2024
spot_img
HomeBreaking Newsअकोला । वाडेगाव पोलीस चौकीचा पोलीस हवालदार अमरावती ACB च्या जाळ्यात...

अकोला । वाडेगाव पोलीस चौकीचा पोलीस हवालदार अमरावती ACB च्या जाळ्यात…

अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील वाडेगाव पोलीस चौकीतील पोलीस हवालदाराला तीन हजाराची लाच घेताना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. सुभाष शालीकराम दंदी, वय-५६ वर्ष, रा.गीतानगर,
राहतनगर जवळ, दुबे एस.टी.डी.चे मागे अकोला. असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरुद्ध बाळापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांनी दिनांक १९/१०/२०२३ रोजी ला.प्र.वि. अमरावती घटक अमरावती येथे दिलेल्या लेखी तकारीचे अनुषंगाने करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आलोसे श्री. सुभाष शालीकराम दंदी पोलीस हवालदार, पोलीस चौकी वाडेगांव यांनी तक्रारदार यांचेवर दाखल असलेल्या एन.सी.क. ७२७ / २०२३ कलम ५०४, ५०६ भादवी अतंर्गत अदखल पात्र गुन्हयामध्ये (१०७/११० सी.आर.पी.सी) अतंर्गत कोणतीही कार्यवाही न करण्याबाबत तडजोडी अंती ३००० /- रूपये लाचेची मागणी केली त्यानंतर आयोजित सापळा कारवाई दरम्यान आज दिनांक २०/१०/२०२३ रोजी आरोपी श्री. सुभाष शालीकराम दंदी यांनी तक्रारदार यांचेकडून तडजोडी अंती ३,०००/- रुपये लाचेची मागणी करून पंचासमक्ष लाच स्विकारली. वरुन नमुद आरोपीविरुध्द पो.स्टे. बाळापूर जि. अकोला येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदरची कार्यवाही श्री. मारूती जगताप, पोलीस अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, श्री. देविदास घेवारे, अपर पोलीस अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, अमरावती श्री. शिवलाल भगत, पोलीस उपअधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, अमरावती, श्री मिलींदकुमार बाहाकार, पोलीस उपअधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही पोलीस निरीक्षक चित्रा कि. मेसरे, पोलीस निरीक्षक केतन मांजरे, मपोकों चित्रलेखा वानखडे पो. कॉ. आशिष जांभोळे, पो.ना.निलेश मेहेंगे, पो.ना. संजय कोल्हे, चालक पोउपनि प्रदिप बारबुध्दे, पोकों स्वप्नील क्षिरसागर यांनी पार पाडली. नागरीकांनी अशाच प्रकारे भ्रष्टाचारा संबंधी तकार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: