Monday, December 23, 2024
Homeराज्यअकोला | महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण केंद्रा तर्फे सशुल्क ब्युटीपार्लर प्रशिक्षण कार्यक्रम...

अकोला | महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण केंद्रा तर्फे सशुल्क ब्युटीपार्लर प्रशिक्षण कार्यक्रम…

अकोला, दि. 6 : (संतोषकुमार गवई)महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण केंद्रातर्फे सशुल्क ब्युटीपार्लर प्रशिक्षण कार्यक्रम दि. 20 मेपासून सुरू होणार आहे. त्यासाठी दि. 16 मेपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे आहे. वयोगट 18 ते 45 वर्षांदरम्यान व दहावी उत्तीर्ण व्यक्तीला प्रवेश मिळू शकेल. प्रशिक्षणात ब्युटीपार्लर, केशरचना, मेकअप आदी बाबी प्रात्यक्षिकांसह शिकवल्या जातील. त्याशिवाय, व्यक्तिमत्व विकास, उद्योग नोंदणी, बाजारपेठ पाहणी, कर्ज प्रक्रिया व विविध योजनांची माहिती दिली जाईल.

अधिक माहितीसाठी कल्याणी तिजारे यांच्याशी 9822391337 व वृषाली काळणे यांच्याशी 9373996027 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र व्यक्तींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे व प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी केले आहे.
०००

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: