Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअकोला | कुख्यात गुंडाचा भाजपात प्रवेश...पोलिसांनी याच गुंडांची रस्त्यावरून काढली होती वरात...

अकोला | कुख्यात गुंडाचा भाजपात प्रवेश…पोलिसांनी याच गुंडांची रस्त्यावरून काढली होती वरात…

अकोल्याच्या कुख्यात गुंड अशी ओळख असलेल्या अज्जू ठाकूर यांच्यासह पत्नीने काल भाजपमध्ये प्रवेश झाल्याच्या बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भाजपचे प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात अज्जू ठाकूर यांच्यासह पत्नीचा प्रवेश झाला. यावेळी अज्जू ठाकूर यांचाही सत्कार करण्यात आला होता. शहर भाजपचे व तसेच जिल्हा भाजपचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अज्जू ठाकूर कोण आहे? हे नाव सर्व अकोलेकरांना काय तर जिल्ह्यातही परिचित आहे. अज्जू ठाकूर हा अकोल्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये मारहाण, खुनाचा प्रयत्न, खंडणीसह इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

साडेतीन वर्षांपुर्वी, म्हणजे १८ एप्रिल २०२० रोजी याच अज्जू ठाकूरची अकोला पोलीसांनी जठारपेठ भागातून धिंड काढली होती. त्याला भरचौकात खास पोलिसी पाहू़णचार देखील दिला होता. अश्या गुंडाची पक्षात एन्ट्री झाल्याने अनेकांचे भाजप बद्दल सूर बदलले आहे. तर येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत पक्ष बाळकट करण्यासाठी गुंड प्रवृतीचा लोकांना घेवून अकोला शहरात किती पक्ष मजबूत होतो हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: