अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे कर्तव्यावर असताना एका पोलिसांवर झालेल्या गोळीबाराचा तपास पुर्ण होत नाही तोच दुसरी हत्येची घटना घडली आहे. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कृषी नगरात एका विद्यार्थ्याचा खून झाल्याची घटना समोर आलीय, या विद्यार्थ्याच्या हत्येने शहरात खळबळ उडाली आहे.
विद्यार्थी खाजगी कोचिंगसाठी अकोल्यात आलेल्या असताना कृषीनगर भागात खोली भाड्याने घेऊन राहणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील रहिवाशी विशाल मधुकर जाटे ह्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याची घटना कृषी नगर भागात आज नववर्ष प्रारंभ दिनी उशीरा रात्री घडली आहे. पोलिस अधिक तपास करण्यात गुंतली आहे.
तर कालच उरळ पोलिसांवर गस्तीदरम्यान चार तरुणांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात दोन्ही पोलीस कर्मचारी बचावले आहे. हा गोळीबार हवेत केल्याच सांगण्यात येत असून अकोला जिल्ह्यातील मांजरी कंचनपूर रस्त्यावर रात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याने जिल्हा पोलिस यांचे मनोधैर्य खचू लागले असतानाच काल रात्री पुन्हा कृषी नगरातील विद्यार्थ्याच्या हत्येने शहरात खळबळ उडाली, याच बरोबर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या बदलीचे आदेश धडकले, मावळत्या एस पि यांना निरोपही हत्येच्या घटनेनेचं! होत आहे, आणि नविन जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांचे स्वागत हत्येच्या घटनेने झाले आहे.