Sunday, December 22, 2024
Homeराज्यअकोला | मनपा प्रशासनाने हद्दवाढीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आस्थापनामध्ये समायोजन करा...अन्यथा सहकुट्रंब आत्मदहन...

अकोला | मनपा प्रशासनाने हद्दवाढीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आस्थापनामध्ये समायोजन करा…अन्यथा सहकुट्रंब आत्मदहन आंदोलन करणार…

पत्रकार परिषदेत दिला इशारा

अकोला: महानगरपालिकाची हद्दवाढ ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामपंचायतिचे कर्मचारी हे अकोला महानगरपालिका कर्मचारी म्हणून नगर विकास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. मात्र सन २०१६ पासून मांनधन तत्वावर कार्यरत आहेत मात्र त्यांचे सन २०२३ पर्यंतही समायोजन करण्यात आले नाही त्यांचे समायोजन करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियन द्वारा संचालित अकोला मनपा वाढीव हद्दीतील ग्राम पंचायत कर्मचारी कृति समितीने वारंवार याबाबत पाठपुरावा केला आहे. मात्र अजूनही मनपा प्रशासनाने या ग्रामपंचायत कर्मचारी यांना आस्थापनेवर घेतलेले नाही या कर्मचाऱ्यांना तात्काळ मनपा आस्थापनावर समायोजन केले नाही त्यांचे समायोजन तात्काळ करण्यात यावे अन्यथा ग्राम पंचायत कर्मचारी कृती समितीचे सदस्य १५ सप्टेंबर रोजी सहकुट्रंब आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा आज त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे

सध्याच्या परिस्थितीत मनपा चे मांनसेवी, कंत्राटी, कर्मचाऱ्यांना हद्दवाढीनंतर मनपामघ्ये कार्यरत ग्राम पंचायत कर्मचारी यांचे पेक्षा जास्त मोबदला दिला जातो वास्तविक ग्राम पंचायत कर्मचाऱ्यानी प्रयत्न करून मनपा तिजोरीत अधिक महसूल जमा करून दिला आहे मात्र सामान्य प्रशासन विभाग अधीक्षक आणि मनपा आयुक्त यांच्या दुर्लक्षाने ह्यांच्यावर अन्याय होत आहे म.न. पा. प्रशासनाकडे याबाबत सतत पाठपुरावा केला आहे या काळात केवळ कारयाई सुरू आहे. अशा आशयाचे पत्र युनियानला दिले जात आहेत अकोला म.न.पा. मुख्य कार्यालाय, अकोला जिल्हा परिपद कार्यालय तसेच अकोला पं.स. कार्यालय हे तीनही कार्यालये ५०० मिटरच्या आतच्या अंतरावर असून पत्रव्यवहार किमान २ महिन्यापासून चालू असून त्यास संबधीत कार्यालयाचे प्रमुख अधिकारी प्रतिसाद देत नाहीत ते का प्रतिसाद देत नाहीत याचा खुलासा होणे गरजेचे आहे. तसेच अकोला पं. स. गटविकास अधिकारी यांनी दि. २७/१२/२०१९ चे पत्रानुसार तात्कालिन ग्रा. प. घ्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासून अकोला म.न. पा. हद्दवाढीच्या घोषणेपर्यत सातत्याने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे ग्रा.प. कामकाज रजिस्टरची पडताळणी अहवाल म न. पा.ला दिला असताना तसेच कर्मचारी समायोजने बाबतच्या मुंबई प्रातिक महानगरपालिकेच्या पालिकेचा अधिनियम १९४९ च्या कलम ४९३ नुसार हद्द वाढ पूर्वीच्या नेमनुका म.न.पा. ला तपासून समयोजनाची कार्यवाही करण्याची तरतृद आहे.

तसेच गटविकास अधिकारी यानी तसा अहवाल म.न. पा, ला दिलेला असतांना कार्यवाही करण्याची मागणी सुरू आहे सन २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नांचा खुलासा करताना मुख्यमंत्री यांनी म.न.पा. द्वारे उपलक्ध माहितीवरून खुलासा सादर करतांना सांगीतले की, एकुण ८९ तात्कालिन ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांची म.. न.पा. द्वारे गठीत विभागीय पात्रता सामितीने पडताळणी केली असता ३৭ कर्मचारी पात्र होते, नगरविकास विभागाचे उपसचिव यांचे मार्गदर्शनमंजुरी पत्रानुसार पुन्हा पडताळणी केली असता ३१ पैकी ५ कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रामष्ये त्रुटी आढळून आल्याने २६ कर्मचारी पात्र दर्शविण्यात आले आहे. या पात्र कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विद्यमान न्यायालयाने ही योग्य निर्णय घेऊन अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश २८सप्टेंबर २०२२ रोजी दिलेले आहेत त्यानंतर ही मनपा प्रशासनाने चाल ढकल केली असल्याने ग्राम पंचायत कर्मचारी यांना आंदोलनाशिवाय कोणताही पर्याय दिसत नसल्याचे पत्र मनपा प्रशासनाला दिले त्यांनीही दखल घेतली नाही म्हणून येत्या १५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियन सह कुटूंब आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा आज त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: