काल आमदार निलेश लंके अकोला येथे आले असता कोरोना काळात रुग्णसेवेमधून झालेला कॉल द्वारे संपर्कामुळे अकोल्याचे गरजुचे रक्तदाते महा-राज्य परिवाचे संस्थापक अमित गजाननराव वरणकार यांनी आमदार साहेबांची भेट घेऊन साहेबांना गरजुचे रक्तदाते परिवाराची सेवा-कार्य महाराष्ट्र भर कशे सुरू आहे आणि कोरोना मधील कामगिरी बाबत साहेबांना अहवाल दाखवला आता पर्यंतची सेवा बघता साहेबांनी अकोल्यातील एका सर्वसाधारण चायवल्याच्या मुलाचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला…
अमितचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांनी या सेवेतून त्याच्या आई वडीलाचे(चायवाले)नाव मोठे केल्याचे आमदार साहेबांनी सांगितले यावेळी सुनील कोकरे ,अकोला येथील युवा उद्योजक लखन भैय्या राठी,राष्ट्रवादी जिल्हाअध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे, मुयर देशमुख,शिवम गवळी,अमित निमकर्डे, साहिल कापकर उपस्थित होते.